बंधार्याचे नित्कृष्ट काम शेतकर्याचे जिल्हाधिकार्याना निवेदन
तळणी : प्रतिनिधी तळणी (रवी पाटील)
येथून जवळच असलेल्या देवठाणा शिवारात होत असलेल्या बंधार्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याने या बंधार्याच्या कामाची स्वःत जिल्हाधिकार्यानी पाहणी करून संबंधीत ठेकेदारावर योग्य ति कारवाई करवी असे दिलेेल्या निवेदनात नमूद केले आहे
बंधार्या शेजारील शेतकर्यानी ठेकेदाराला तुम्ही नित्कृष्ट दर्जाचे काम का करता म्हणुन विचारणा केली असता ठेकेदाराने शेतकर्याना . तुला एका तासात गुंडे आनुन उचलुन नेईल व जिवे मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिल्याने धास्तावलेल्या शेतकर्यानी जिल्हाधिकार्याकडे धाव घेऊन सबंधीत कामाच्या दर्जाची पाहणी करण्या संबंधीची विनंती या निवेदनात केली आहे कामाचा दर्जा चांगला ठेवा यासदर्भात शेतकर्यानी अनेक वेळा ठेकेदाराला सांगून सुध्दा या बंधार्याचे काम नित्कृष्ट झाले आहे
संबंधीत शेतकरी हे सेनगाव तालुक्यातील असुन त्याच्या जमीनी या देवठाणा . शिवारात आहे गट न ४६० / ४६१/ ४६२/४६३ / ४५४ / ४८१ / या गट नबर मध्ये संबंधीत शेतकर्याच्या जमीनी आहेत संबंधीत बंधार्याचे काम मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने मजूर करण्यात आले असुन या कामावर संबंधीत विभागाचे अधिकारी हजर राहत नाही
नित्कृष्ट काम होत असल्याने बंधारा जास्त दिवस टिकणार नाही यामुळे शेतकर्याचे मोठे नुकसान होईल असेही निवेदनात नमूद केले आहे
या निवेदनावर ज्ञानदेव वाघ , भगवान वाघ , महादेव वाणी , मदन वाघ , रामेश्वर वाघ , सुभाष वाघ , रामकिसन वाघ , समाधान वाघ , प्रल्हाद वाघ , शालीकराम वाघ , देवीदास वाघ , दिनकर वाघ , इत्यादी शेतकर्याच्या स्वाक्षर्या या निवेदनावर आहे
संबधीत गुतेदार नित्कृष्ट दर्जाचे काम करीत आहे गुंड आनुन उचलून नेण्याची धमकी फोन वर देत आहे कामाची चौकशी होणे गरजेचे आहे नसता आम्ही दि १८ / १२ / २०२३ पासुन गट न .४६२ /व ४६३ या गट नबर मंधील शेतात उपोषण करणार असल्याचे शेतकरी सुदाम वाघ यांनी सांगीतले