श्रीष्टी व सातोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती करिता बारा कोटी रुपये निधी मंजूर,आमदार बबनराव लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
परतूर / प्रतिनिधी कैलाश चव्हाण महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाची विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार यांच्याकडे गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत निधीची मागणी केल्याने सातोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती करिता आणी कर्मचारी निवासस्थानाचे इमारती करिता सहा कोटी रुपये निधी तर श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती करिता आणि कर्मचारी निवासस्थानी इमारती करिता सहा कोटी रुपये असा एकूण सुमारे बारा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार यांनी राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांना पत्राद्वारे कळविले आहेत. पन्नास वर्षांपूर्वीचे जुने बांधकाम असलेल्या या इमारती मोडकळीस आल्याने पावसाळ्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसाळ्याची पाणी गळत होते. इमारतीच्या भिंती कधीही कोसळून पडतील अशी शक्यता