महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही -काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख , विकासा साठी महावीकास आघाडी ची गरज -मा आ. सुरेशकुमार जेथलीया,अद्याप जेथलियाला विकत घेणारा पैदा झाला नाही - नितीन जेथलीया
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
सामान्य जनतेच्या हिताच्या, अन्यायाच्या विरुद्ध लढणाऱ्या,आणि भारतीय जनता पार्टीच्या हुकुमशाही आणि मस्तवाल पनामुळे मतदार संघातील सुटलेल्या प्रगतीसाठी काँग्रेस पक्षा शिवाय, महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले.
परतूर विधानसभा मतदारसंघातील, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या संकल्प मेळाव्यात व्यासपीठावर मा. आ.सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, सुभाषराव मगरे, प्रभाकर मामा पवार, नितीन जेथलिया,किसनराव मोरे,बाळासाहेब (काका)आकात, आन्नासाहेब खंदारे, एकनाथ कदम, संतोष दिंडे, शमशोद्दीन शेख, आर.के. खतीब, दत्ता भाऊ बनसोडे, पांडुआबा कुरधने, माऊली वायाळ, संग्राम भैय्या लोणीकर,निळकंठ वायाळ, बाबासाहेब गाडगे, शबाब कुरेशी, वैजनाथ बागल,सुखलाल राठोड,भागवत उफाड,जयराम राठोड, मदनराव हजारे, सर्व मंठा, परतूर शहराचे नगरसेवक,शाम बाबा काळे, महिला आघाडी,बद्रीभाऊ खवणे हे उपस्तिथ होते.
याप्रसंगी पुढे बोलताना राजाभाऊ देशमुख म्हनाले की,परतूर मतदारसंघात कंग्रेसची ताकद मोठी आहे. सत्ता नसतांना सुद्धा जीवाभावाचे कार्यकर्ते, आणि मतदार आहेत. सत्ताधारी भाजपाच्या दडपशाहीला कार्यकर्ते,मतदार कंटाकळे असून या वेळी काँग्रेसचे मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांचा विजय निश्चित आहे.
प्रारंभी एकनाथ कदम, अण्णासाहेब खंदारे, बालासाहेब अंभिरे,राजेंद्र राख, माउली वायाळ, संग्राम लोणीकर यांची भाषणे झाली.या प्रसंगी नितीन जेथलिया यांनी भाजपाच्या कार्यशैली आणि सत्ताधारी आमदारांचा खरपूस समाचार घेतला.बिनबुडाचे आरोपांचे कडक शब्दात खंडन केले, अद्याप जेथलियाला विकत घेणारा पैदा झाला नाही.नवश्रीमंत अन पिढीजात यात फरक आहे. मतदारांच्या तोंडाला पाने पुसुन विकासाची टिमकी वाजवनाऱ्याला जनताच जागा दाखवेल.संस्कृती,सभ्यता,संस्कार,जेथलिया यांची पुण्याई आहे.या बाबत जनताच न्याय देईल.शेवटी बोलतांना मा.आ.सुरेशकुमार जेथलिया भाषणात म्हणाले की, सत्ता नसतांना सुध्दा माझ्यावर प्रेम करणारे, पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हीच माझी संपत्ती आहे.त्यांच्या सहकार्याच्या बळावरच आणि पाठिंब्या मुळेच परतूर मतदारसंघा करिता मी सतत कार्यरत आहे.
यावेळी 'महाविकास आघाडी चा विजय निश्चत आहे. कार्यकर्त्यांनी आमिषाला बळी न पडता, काँग्रेसच्या बळकटी साठी प्रयत्न करावे व निवडणुकीच्या कामाला लागावे.
यावेळी भाजपाचे मंठा तालुक्याचे नेते माऊली वायाळ व परतूर तालुक्यातील पंजाबराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्याच बरोबर संग्राम भैय्या लोणीकर यांनी पक्षात प्रवेश घेत त्यांची युवक काँग्रेस च्या परतूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
या संकल्प सोहळ्यास हजारोच्या संख्येने प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मेळाव्याचे सूत्र संचालन लक्ष्मण शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन किसनराव मोरे यांनी केले.