शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नामुळे परतूर शहरात विद्युत खांबासह पंच केबल जोडणी सुरू

परतुर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण 

 परतुर शहरातील अनेक भागा मध्ये गेल्या कीत्येक वर्षापासूनची नागरीकांची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली असता.
   पालक मंञी आतूल सावे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ जिल्हा नियोजन व विकास मंडळा मार्फत निधी मंजुर करावा असे आदेश दिलेअसता अग्रवाल यांनी शिवसेनेचे विभागीय नेते अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करुन विद्युत खांब व बंच केबल साठी निधी उपलब्ध करून घेतला. परतुर शहरासाठी शंभर विद्युत खांब व बंच केबल शहरासाठी उपलब्ध करून दिले परतुर शहरातील राजे संभाजीनगर ,आदर्श कॉलनी, जय भद्रा नगर, शिवनेरी नगर, पंचशील नगर, वडारवाडी, बालाजी नगर ,व्यंकटेश नगर ,एसटी कॉलनी नागोबा मंदिर जवळ, मोरे यांचा मळा ,जगन्नाथ नगर व इंदिरानगर अशा परतूर शहरातील विविध भागात नागरिकांच्या विद्युत लाईट विषयी समस्या लक्षात घेता विद्युत खांबसह बंच केबल जोडणी करून देत आहेत. तीनशे चारशे फुटाच्या अंतरावरुन नागरिकांनी विद्युत कनेक्शन जोडणी केलेली पाहता येणाऱ्या काळात घात घडू नये व गंभीर परिणाम होऊ नये.
 तसेच शहरातील नादुरुस्त झालेले रोहित यासाठी 35 लक्ष रुपये मुख्यमंत्री यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी सतत केलेल्या पाठपुरावामुळे उपलब्ध झालेले आहेत संबंधित नागरिकांना विद्युत खांब बंच केबलसह विद्युत कनेक्शन दिल्यामुळे या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचा ठिकठिकाणी त्रस्त झालेले नागरिक सत्कार करत आहेत व त्यांचे आभारही मानत आहेत. यावेळी ईंदीरा नगर परीसरातील माजेद पठाण, उमर भाई, फिरोज शेख, नवीम शेख ,याकूब गुलाब शेख ,इमरान शेख, दिलदार पठाण, इस्माईल शेख इमरान शेख,आयान बागवान ,सलीम शेख ,लालाखान पठाण, शेख हसन भाई, कैलास जाधव ,समीर शेख ,अल्ताफ शेख, शाहिद पठाण , फरहान सय्यद व आदी इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचे आभार मानून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात