आजचे विद्यार्थी उद्याचा मजबुत भारत.-पो.नि.मच्छिंद्र सुरवसे

       परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
 दि.०५ जानेवारी रोजी आनंद प्राथमिक विद्यालय व आनंद इंग्लिश स्कूल परतूर येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना परतूर पोलीस स्टेशनचा सुनियोजित कारभार दाखवण्यासाठी क्षेत्रभेट घेण्यात आली.
         याप्रसंगी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत केले.पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते याची पूर्ण माहिती त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना समजावून सांगीतली.
     यावेळी विद्यार्थ्यांना मुद्देमाल कक्ष, गोपनीय कक्ष, पोलीस कोठडी, वायरलेस सेट, सीसीटीव्ही प्रणाली, गुन्हे प्रणाली, आँनलाईन एफ आय आर,बारनिशी कक्ष, क्राईम रायटर्स कक्ष,इ.बद्दल व्यवस्थित माहिती सांगितली. विद्यार्थी खुपचं मनापासून पोलीसांच्या कामकाजाचे निरीक्षण करत होते. पोलीसांच्या विविध शस्त्रांबद्दल माहिती देत ही शस्त्रे विद्यार्थ्यांना पाहायला देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
     याप्रसंगी बोलताना पो.नि.सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
       यावेळी पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ कॉन्स्टेबल  हाडे,  पवार ,  जाधव  खाडे,महिला कॉन्स्टेबल श्रीमती वाघ, श्रीमती मांडे, उपस्थित होते.
       आनंद इंग्लिश स्कूलचे प्राचार्य नारायण सागुते, श्रीमती रूपाली मुसळे, श्रीमती कविता गुंजकर, श्रीमती सीमा सातोनकर, श्रीमती रूपाली नंदिकोले, यांनी पो.नि.सुरवसे साहेब यांचे केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात