आरती मुके ची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड.
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतूर येथील आरती भाऊसाहेब मुके ची सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स आंबेगाव पुणे या कॉलेज मध्ये बि.एस.सी. बायोटेक च्या द्वितीय वर्षात शिकते. तिची कॉलेज च्या वतीने २०२४ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली.
आरती ही खर तर क्रिकेट मधील उत्कृष्ठ ऑल राऊंडर खेळाडू असुन ती कॉलेज च्या टीम ची कर्णधार आहे. परंतु क्रिकेट सोबत तिने कब्बडी व वॉलिबॉल मध्ये चमकदार कामगिरी बजावली म्हणून कॉलेज च्या वतिने तिला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करून गौरवण्यात आले. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू पियुष हनुवंते सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सिंहगड कॉलेज चे प्राचार्य डॉ. श्री. मगन घाटूळे, उप प्राचार्य दिपा रमाणी, क्रिडा प्रशिक्षण श्री. संतोष नवले, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख विभावरी दिक्षित, सोनल मॅडम, मनिषा मॅडम, ऋतुजा मॅडम, लोंढे सर आदिंचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या उपस्थितीत आरतीला मेडल देऊन सन्मानित केले..