पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन.
परतूर प्रतिनिधी : कैलाश चव्हाण
सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती व आधारवड फाउंडेशन यांच्या वतीने शिव जन्मोत्सव निमित्त भव्य पोवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २७ फेब्रु. रोजी सायं. ठीक सात वाजता योगानंद माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आवाजाचे सुप्रसिद्ध शिवशाहीर प्रा. अरविंद घोगरे पाटील यांच्या पहाडी आवाजात भव्य पोवाड्या च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाला मा. मंत्री तथा आ. बबनराव लोणीकर, माजी आ. सुरेश जेथलिया, कपिल भैय्या आकात, माधवराव मामा कदम, रामेश्वर अण्णा नळगे, शाम वाडेकर, मोहन अग्रवाल, बाबाजी तेलगड सह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
तरी सर्व शिव भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन जन्मोत्सव समिती व आधारवड फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.