अंतकरणात पाप नसेल तरच खाल्लेल पचत -ह भ प समाधान महाराज शर्मा
परतुरात शिवकथेला मोठा प्रतिसाद.
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
गरिबांना चांगलं जेवण मिळत नाही म्हणून ते बेजार आहेत, तर श्रीमंतांना भूक लागत नाही म्हणून ते बेजार आहेत. मात्र खाल्लेले तेव्हाच पचत, जेव्हा तुमच्या अंतकरणात पाप नसेल असे निरूपण शिव कथा चार्य ह भ प समाधान महाराज शर्मा यांनी चौथ्या दिवशी दिले.
माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया आयोजित शिव कथा व कीर्तन सोहळ्यास परतुर तालुका व परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावत आहे आज कथेच्या चौथ्या शहर भक्तिमय झाले होते. कथे चा विस्तार करताना ह भ प समाधान महाराज शर्मा म्हणाली की, काही लोक पहाटे काम मिळावं म्हणून पळतात तर काही लोक खाल्लेले पचन व्हावं म्हणून पळतात 'मत सोच जिंदगी के बारे मे इतना, जिसने भी है उसने भी सोच कर दि है.'तुमच्या हातून होत असलेले पाप बंद करा. तुम्हाला प्रणायाम असे काहीच करण्याची गरज नाही. मरणाला घाबरू नका. महिलांना पुरुषाला कडून प्रेम पाहिजे असते ते मिळत नाही आणि पुरुषांना महिलांकडून आदर पाहिजे असतो तो मिळत नाही म्हणूनच पती-पत्नीत वाद असतो जावयाने सासरवाडीला बोलायला शिका आहे जाऊ नये. सती न बोलवता जाते व अनर्थ घडतो. आपला देश पवित्र आहे. जेवढे अवतार झाले तेवढे भारतातच झाले. भविष्य बघायचं नसतं तर भविष्य घडवायचं असतं. आपला हात कोणालाही दाखवू नका पार्वतीचे भविष्य साक्षात संत नारदांनी बघितलं होतं. आणि तेच पुढे घडलं. स्वामी विवेकानंदांनी आपलं भविष्य स्वतः खूप कमी वयात घडवलं. नारदांनी पार्वतीचे भविष्य सांगितलं होतं की तिला मिळणारा पती हा साधा नसेल महायोगी, निर्गुण मोठा तपस्वी स्मशानात राहणारा, मळके कपडे घालणारा, बैलावर बसणारा असेल असे सांगितले होते. साक्षात तसेच घडले कारण पार्वतीने आपली तपश्चर्या पूर्ण केली होती. आणि पार्वतीला महादेव पती मिळाले असे सांगून पुढे महादेव पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचे संगीतमय वातावरणात वर्णन करून शेवटी ह भ प समाधान महाराज शर्मा यांनी कथेचा समारोप केला या कथेत माजी मंत्री आमदार राजेश टोपे, माजी सभापती कपिल आकात, माधवराव कदम, कांतराव सोळंके, संग्राम लोणीकर, शाहूराव धुमाळ, संजय सावंत,सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.