तळणी येथे १९९० -९१ दहावी कक्क्षा विद्यार्थ्याचा स्नेह संवाद मेळावा संपन
तळणी प्रतिनिधी रवि पाटील
मंठा तालुक्यातील तळणी येथील १९९० -९१ दहावी कक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा स्नेह सवाद मेळाव्याचे आयोजन तळणी जि प प्रशालेच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते सर्वप्रथम मा जिजाऊच्या व क्रांतीज्योती सावीञी बाई फुले याच्या प्रतिमेचे पूजन गाव कारभार्याच्या वतीने करण्यात आले मान्यवराचे स्वागत करण्यात आल्या नंतर अनेकांनी आठवणीना उजाळा दिला
जवळपास ३४ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर हे सर्व वर्गमीञ एकमेकांना भेटले यातील बरेच मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे काही शिक्षक , वकील इंजिनियर कोणी चांगल्या हुद्यावर तर कोणाशी वारकरी संप्रदायाच्या विचारां सोबत जोडलेली नाळ प्रदीर्घ ३३ वर्षाचा कालखंड खूप मोठा असल्याने या सर्वाच्या भेटीने आपखुदच एक प्रेमाचा हक्काचा अधिकाराचा ओलावा . या सर्व मिञाच्या भेटीत दिसून आला आज जरी या सर्वानी पन्नाशी पार केली असली तरी या सर्वाच्या स्नेह मिलनाने त्याच्या मध्ये तरुणाईचा उत्साह पाहायला मिळाला . शाळेतील त्या काळातील शिक्षकाचा दरारा अभ्यासाची पध्दत गुरुजंन मंडळी बद्दल असलेला आदर व भिती कशी असायची या सर्व आठवणीना यावेळी उजाळा दिला . जवळपास ५० ते ६० विद्यार्थी विद्यार्थीनीने या स्नेह मिलनात सहभाग घेऊन एकमेका बद्दल आदर व्यक्त केला . पूणे पंढरपूर छञपती संभाजी नंगर लातूर जालना मुबई बुलढाणा सोलापूर . येथे कामानिमीत्य असलेले संवगडी सुध्दा वेळ काढून या स्नेह मिलनाच्या कार्यक्रमासाठी आले होते
आपण ज्या शाळेत शिकलोत लहानचे मोठे झालो ही प्रत्येकाची भावना असल्याने शाळेला नेमकी काय अडचण आहे यांची सर्व माहीती कार्यक्माचे अध्यक्ष्य श्री पंधे सराकडून या माजी विद्यार्थानी घेतली . शाळेच्या विकासात माजी विद्यार्थाचे सहकार्य महत्वाचे आहे व या साठी सर्वाची मदत असणे गरजेचे असल्याची भावना . श्री पंधे सर यानी व्यक्त केल्यानंतर शाळेसांठी एक सुसज्ज ग्रथालय व स्वच्छतागृह व शुध्द पाण्याचा पुरवठा करणारी यञणां कार्यान्वीत करण्याचा संकल्प या सर्व माजी विद्यार्थ्यानी घेतला या एकञीकरणामध्ये अनेक हुद्यावर असलेलेल्या विद्यार्थाचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी सरपंच उपरसपंच शालेय शिक्षक यांची प्रमुख उपस्थीती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दताञय महाराज पवार संजय शिलवंत रामदास सरकटे डॉ गिरधारी चव्हाण माधुरी जोशी यमुना चव्हाण उध्दवराव काळे गजानन घोडे शकुंतला डोईफोडे .या व अनेक माजी विद्यार्थाचा मोठा सहभाग या स्नेह मिलन कार्यक्रमात दिसून आला स्नेह भोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली