प्रत्येक माणसाने आनंदाने जगणं, परमेश्वराचे नाव घेऊन जगणं ही आज काळाची गरज झाली आहे- योगानंद बापू महाराज
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर तालुक्यातील श्रीष्टी तांडा येथे संत सेवालाल महाराज यांच्या 285 व्या जयंती निमित्त आयोजित अखंड सेवालाल महाराज सप्ताहाच्या कार्यक्रमाला श्री योगानंद बापू महाराज यांनी उपस्थित राहून भविकांशी संवाद साधला.प्रत्येक माणसाने आनंदाने जगणं, परमेश्वराचे नाव घेऊन जगणं ही आज काळाची गरज झाली आहे. या पृथ्वीवर आपण प्रवासी म्हणून आलो आहे, एक दिवस सर्वांनाच जायचे आहे. म्हणून जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सर्वांशी प्रेमाने, आनंदाने वागले पाहिजे. मनुष्याच्या जीवनात धार्मिक अधिष्ठान खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे धार्मिक सोहळे होत राहिले पाहिजे.
या प्रसंगी श्रीष्टी तांडा व परिसरातील बंजारा समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होता