संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी योजनेच्या माध्यमातून बंजारा तांड्यांचा कायापालट होण्यास मदत होणार आहे सरपंच सीताराम राठोड ,भारतीय जनता पार्टी चे सरपंच सीताराम राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर यांचे मानले आभार
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
राज्यात संत सेवालाल महाराज बंजारा, तांडा समृध्दी योजना राबविण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील बंजारा, समाजाच्या तांड्यांचा विकास होणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून तांड्यात पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, आरोग्य पथदिव्य, गटारे, अंतर्गत रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कामांसाठी किमान 30 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृध्दी योजनेच्या माध्यमातून बंजारा तांड्यांचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी चे परतवाडी चे युवा सरपंच सीताराम राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर यांचे आभार मानले.
“संत सेवालाल महाराज बंजारा,लमाण तांडा समृध्दी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यामुळे राज्यातील बंजारा तांड्याचा कायापालट होण्यास सुरुवात होईल. त्यासह ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी असलेली अंतराची अट शिथिल करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच बंजारा त्यामुळे आता एक हजार लोकसंख्या असलेल्या बंजारा तांड्यांत नवीन ग्रामपंचायत स्थापन होणार आहे. तसेच राज्यातील बंजारा तांड्यांना महसूली दर्जा प्राप्त होणार आहे.तांड्यातील सर्वसमान्य माणुसही सरपंच होऊ शकणार या माध्यमातून बंजारा समाजात नवीन नेतृत्व उदयास येण्यास हातभार लागेल”, असे मत श्री सरपंच सीताराम राठोड यांनी व्यक्त केले आहे.