न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नीरोप सभारंभ संपन्न
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हा
परतूर येथील न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नवविच्या विद्यार्थ्यांकडून दहाविच्या विद्यार्थ्यांना दि.२१ बुधवार रोजी निरोप सभारंभ देण्यात आला या मधे नववीच्या विद्यार्थ्यांनी भरगच्च करमणुकिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.
या वेळी दहाविच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पेपर विषयी तसेच दहावी नंतर काय? याबद्दल ही सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दहाविच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष नारायण सोळंके, सौ पार्वताबाई सोळंके, कार्याध्यक्ष गणेश सोळंके, सचिव सौ छाया बागल, प्रिन्सिपल साम वर्घिस व संपूर्ण शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षिकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवविची विद्यार्थ्यांनी कार्तिकी कवडे हिने केले तर आभार प्रदर्शन सेजल सवने हिने व्यक्त केले.