महाराजे मल्हारराव होळकर यांचे विचार आत्मसात करून समाज बांधवाने पुढे यावे- प्रकाश सोनसळे (अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य)
बीड प्रतीनिधी
बीड येथील नामलगाव फाटा या ठिकाणी राजे मल्हारराव होळकर यांची 331 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मल्हारराव होळकर यांचा इतिहास जागा करण्यासाठी धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुढाकार घेऊन युवकांना प्रेरणा मिळेल असे काम मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज नामलगाव फाटा व घोसापुरी या गावांमध्ये मल्हारराव होळकर यांचा इतिहास जागा करण्यासाठी या गावातील युवकांनी पुढे येऊन पुढाकार घेतला.
मल्हारराव होळकरांचा इतिहास मोठा आहे हा इतिहास आपण सर्वांनी जागृत केला पाहिजे व गावोगावी मल्हारराव होळकर यांचे विचार आपण पोहोचले पाहिजे असे या ठिकाणी बोलताना मा.प्रकाश सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांनी समाज बांधवांशी बोलताना सांगितले.
बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मल्हारराव होळकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
या वेळी उपस्थित धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष. प्रकाश सोनसळे, अमोल भोंडवे युवक तालुकाध्यक्ष धनगर समाज पाटोदा, घोसापुरी चे दबंग सरपंच फारूख भैय्या पटेल व उपसरपंच सुभाष जाधव, घोसापुरी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र माळी. सुरेश वैद्य (ग्रा .पं. मेंबर).
जिल्हा संघटक अध्यक्ष सोमनाथ कुदवन. बीड तालुका युवक अध्यक्ष अंकुश वैद्य. बीड तालुका सरचिटणीस दत्ता काळे. बीड तालुका सचिव गौरव वैद्य. रतन वैद्य, श्रीमंत वैद्य, परमेश्वर वैद्य, हनुमंत वैद्य, जालिंदर नेंगुळे,बाळू मुळे, समाधान मासाळ,तानाजी वैद्य, विजय घोंगडे, संदीप वैद्य, कल्याण वैद्य, जयराम गुरव, महेंद्र शिंदे, अविनाश वैद्य,वैभव वैद्य, अभिषेक नेंगुळे,ओम मुळे, अशोक यादव, बाळासाहेब प्रभाळे.