शिवसेना भटके विमुक्त विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजी तरवटे
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतूर (प्रतिनिधी): हनुमंत दवंडे शिवसेना भटके विमुक्त विभागाच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी निष्ठावंत शिवसैनिक शिवाजी तरवटे (परतूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना उपनेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, भाऊसाहेब घुगे, यांच्या शिफारशी वरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी शिवाजी तरवटे यांची नियुक्ती केली असून हिंदुहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी
विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तळागळातील भटक्या विमुक्तांपर्यंत पोहोचवावी आणि त्यांना संघटित करून जिल्ह्यात पक्ष संघटन वाढवावे असे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले .या नियुक्ती बद्दल शिवाजी तरवटे यांचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.