सेवानिवृत्त कर्मचारीही करणार मतदान जनजागृती
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि.१६ - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने कसोशीने प्रयत्न केले जात असून मंगळवारी (दि.१६) नोडल अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रशांत रोहनकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचे आवाहन करणार असल्याचा विश्वास यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवला.
यासंदर्भात निवडणूक नोडल अधिकारी प्रशांत रोहनकर म्हणाले की,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना समाजात मानाचे स्थान असते. त्यांच्या शब्दाला किंमत असते.हा मुद्दा लक्षात घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. उपस्थित सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्याचे तसेच निवडणूक विभागाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
यावेळी विष्णुपंत खंडागळे, सुभाषराव बागल, शेख मोईन, सुनील स्वामी, रमाकांत बरीदे, सत्यनारायण सोमाणी, अशोक डिघोळे, खतीब, सुलताना बामुसा आदी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासह स्विप कक्षाचे सदस्य कल्याण बागल उपस्थित होते.