निवडणूक निरीक्षकांची परतूरला भेट
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि.१५ - लोकसभा निवडणूक निरीक्षक विष्णुकांत यांनी सोमवारी नवोदय विद्यालयात सुरु असलेल्या प्रशिक्षणास भेट दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरु आहे. नियुक्त करण्यात आलेले कर्मचा-यांना जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.दि.१५ व १६ एप्रिल असे दोन दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी प्रशिक्षण सुरु असताना निवडणूक निरीक्षक विष्णुकांत यांनी प्रशिक्षण ठिकाणी भेट देऊन एकंदरीत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, सोनाली जोंधळे, नायब तहसीलदार विजयमाला पुपलवाड, चिंतामण मिरासे, विनोद भालेराव,संतोष पवार,रुस्तुम बोनगे, बाबासाहेब तरवटे यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.