राजेंद्रप्रसाद अग्रवाल यांचे निधन
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
येथील व्यापारी राजेंद्रप्रसाद मोहनलाल अग्रवाल(६३) यांचे दीर्घ आजाराने जालना येथील खाजगी दवाखान्यात रविवारी दि.२८ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ,पत्नी,एक मुलगी,एक मुलगा होत.ते रा.स्व.संघाचे कार्यकर्ते मनिष अग्रवाल यांचे काका होत.
त्यांच्यावर शहरातील स्मशानभूमीत रविवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील व्यापारी,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील तसेच मित्र मंडळी उपस्थित होते.