परतूरला निवडणूक निरीक्षक चंद्रा यांची भेट,निवडणूकीच्या तयारीचा घेतला आढावा



परतू प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   दि.७ - निवडणूक खर्च निरीक्षक अनुराग चंद्रा यांनी रविवारी तहसील कार्यालयास भेट देऊन लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाचा आढावा घेतला. दरम्यान, आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात बैठक घेत त्यांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. तसेच विविध विषयांवार मार्गदर्शन केले. यावेळी संपर्क अधिकारी सचिन कवठे यांचीही उपस्थिती होती.
    परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीसाठी परतूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाची जय्यत तयारी सुरु आहे. विविध कक्षात नेमणूक केलेले कर्मचारी निवडणूकीच्या कामात व्यस्त आहेत. निवडणूक खर्च निरीक्षक अनुराग चंद्रा यांनी रविवारी शहरात भेट देऊन निवडणूक कामाचा आढावा घेतला. निवडणूक खर्च पथक, आचारसंहिता पथकाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.परतूर व मंठा तालुक्यात तळणीफाटा,सेवली, साईबाबा चौक येथील चेक पोस्टला त्यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
  बैठकीला सहाय्यक निवडणूक अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार प्रतिभा, मंठा येथील तहसीलदार सोनाली जोंधळे, नायब तहसीलदार चिंतामण सुरासे, विनोद भालेराव, श्रीमती पुपलवाड मॅडम,कल्याण बागल,श्रीकांत गादेवाड सर, रमेश आवटे सर, संतोष पवार, कृष्णा सोनवणे,नितीन निलेवाड,रईस शेख यांच्यासह निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....