सन 2008-09 लालबहादूर शास्त्री अध्यापक विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह-मेळावा संपन्न
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
लालबहादूर शास्त्री अध्यापक विद्यालय परतुर माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी स्नेह मेळावा शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी पार पडला. लालबहादूर शास्त्री अध्यापक विद्यालय सन 2008-2009 डि यड च्या वर्गाने माजी विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेह मेळावा 15 वर्षानंतर आयोजित केला होता.या स्नेह मेळावा मुळे जुन्या आठवणी जागा झाल्या आणि अनेकांना गहिवरून आले
लालबहादूर शास्त्री अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये माजी विद्यार्थी मेळावा अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. सकाळी पासून सायंकाळी पर्यंत हा सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याची सुरुवात सर्व माजी विद्यार्थ्यांच्या परिचयापासून झाली. प्रत्येकाने मंचावर येऊन आपला परिचय करून देत असताना या शाळेमध्ये पुसट होत चाललेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कधीकाळी आयुष्याच्या पाठीवर शिक्षण रुपी पेन्सिलीने स्वप्ने लिहू पाहणारे आपण एकत्र शिकलो,एकत्र खेळलो, मौजमजा केली ,हसलो, रागावलो ,भांडण सुद्धा केली.या सर्व मोजमजा थट्टा मस्करी च्या आठवणींना सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुनर्जीवित केले. स्नेह मेळावा मुळे जुन्या आठवणी जागा झाल्या आणि अनेकांना गहिवरून आले .त्यानंतर सरस्वती प्रतिमेचे पूजन माजी विद्यार्थी संपत टकले गितांजली टकले यांच्या हस्ते करून स्नेह मेळाव्याची सुरुवात करण्यात आली मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आज प्रत्येक जण या ठिकाणी सक्षमपणे या कार्यक्रमांमध्ये आपले आनंदाचे क्षण मांडत होता. कुणी शिक्षक, कोणी पोलिस ,कोणी राजकारणी, कोणी ,व्यवसायिक कोणी ,उत्तम शेतकरी झाले हा सोहळा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.रांगोळी पासून ते नाष्टा,चहा,आसन व्यवस्था, डेकोरेशन, स्वादिष्ट भोजन, सायंकाळी चहा व कॉफी तंतोतंत व सुरेख नियोजनासाठी माजी विद्यार्थी संपत टकले मयुरी डोलारकर शीतल दवणे गीतांजली काळे कुणाल शहाणे अर्चना सरकटे या सर्वांनी घेतलेले कष्ट खूप मोठे होते. या सोहळ्याचे नियोजनबद्ध रुपरेषा तयार करण्यासाठी सूत्रसंचालनाची कमांड माजी विद्यार्थी अनंता अवचार याने सांभाळली. तर प्रास्ताविक विकास गव्हाणे यांनी सांभाळली या सोहळ्याच्या शेवटी उपस्थित राहिलेल्या मित्र-मैत्रिणीचे आभार संपत टकले यांनी मानले
या सोहळ्यासाठी विठ्ठल बरकुले ओम कानडे सीमा मानवतकर अंजली कोकर मीनाक्षी लोखंडे सुभाष गवळी मुकुंद मुंडे बाळू म्हात्रे शरद मोगल राजू गजले प्रीती धुमाळ मोनिका ठाकरे सोनू उखळकर शारदा पवार कृष्णा मुळे सुरज चव्हाण नीरज धुडके अवधूत धोंडगे विकास गव्हाणे आदी उपस्थिती होती