आनंद विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे शिष्यवृती परिक्षेत यश
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आनंद प्राथमिक विद्यालय व आनंद इंग्लिश स्कूल परतूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळाले आहे.
इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला,या परीक्षेसाठी विद्यालयातून चांगलाच प्रतिसाद होता . आनंद प्राथमिक विद्यालयाचे इयत्ता पाचवीचे कबीर कैलास पाईकराव, अंजली रामदास फुफाटे, आदित्य रामदास फुफाटे,अथर्व नरेश अंभूरे, रितेश शाम देशमुख हे विद्यार्थी तर इ.आठवीचे पार्थ प्रवीण बागल हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत.
तसेच आनंद इंग्लिश स्कूल चे इयत्ता पाचवीमधून हर्षदा गायके,अवनी काळे,तर इ. आठवीमधून संस्कृती देवरे,स्वराज चव्हाण, वैष्णवी बरकुले, विक्रम रणबावळे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत.
सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एकनाथ कदम, मुख्याध्यापिका श्रीमती सत्यशीला तौर मुख्याध्यापक संजय कदम इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल नारायण सागुते व सर्व शिक्षक यांनी कौतुक केले.