ग्रामपंचायत खरपुडी येथील विकास कामात झालेला भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरीता निवेदन


जालना प्रतिनिधी समाधान खरात 
ग्रामपंचायत खरपुडी मध्ये मागील दोन वर्षामध्ये विकास कामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार झाला आहे 
या सर्व कामांची सखोल चौकशी करण्यात यावी या करिता आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले यामध्ये विद्यमान सरंपच व सरपंचाचे पती व ग्रामसेवक यांनी संगनमत करुन मागील दोन वर्षामध्ये बोगस कामे करुन लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार केला आहे. तसेच कागदोपत्री ग्रामसभा दाखवून १५ वित्त आयोग मुद्रांक शुल्क यामध्ये आलेल्या निधीची परस्पर विल्लेवाट लावली आहे. आम्ही माहिती अधिकारा मध्ये माहिती काढली असता त्यामध्ये स्माशन भुमी लेवलिंग साठी नऊ लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. परंतु तेथे अद्यापी कोणताही खर्च करण्यात आला नाही. सरंपच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून विविध ठिकाणी बोगस कामे दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार केला आहे.अशी तक्रार आम आदमी पार्टी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे जर भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास येत्या पाच जून रोजी जिल्हा परिषद कार्यालय समोर आमरण उपोषण करू असे म्हटले आहे
या निवेदनावर आम आदमी पार्टीचे सुभाष देठे संजोग हिवाळे फिरोज बागवान समाधान खरात उमेश काळे कैलास देठे आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड