आनंद इंग्लिश स्कूल चा एस.एस सी परीक्षेत शंभर टक्के निकाल


परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर येथील आनंद इंग्लिश स्कूलचा पहिल्याच बॅच चा निकाल शंभर टक्के लागला असून त्याचा विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये हर्ष उल्हास निर्माण झाला आहे.
  आनंद इंग्लिश स्कूल या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल  शंभर टक्के लागला आहे. निकाला मध्ये वैष्णवी रामप्रसाद माने हिला (89.20%) गुण घेऊन सर्वप्रथम  ,  द्वितीय वैष्णवी भारत थिटे (83.80%) व तृतीय क्रमांक दिनेश गुलाबराव मिसाळ (83.20%) आलेली आहे 
   शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एकनाथ कदम, उपाध्यक्ष डॉ. भानुदास कदम, सचिव सुंदरराव कदम, प्राचार्य नारायण सागुते , विकास काळे, दिपाली वापटे, सचिन नंदिकोले , सचिन राठोड, शीतल खरे आदींनी सर्व उत्तर्णी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....