डॉ. स्वप्नील मंत्री यांचा वाढदिवस विकसीत भारत हर दिल में मोदी हा अनोखा अभियान राबवून साजरा
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर येथील बालरोग तज्ञ तथा आहार विशेषज्ञ डॉ. स्वप्नील मंत्री यांचा वाढदिवस विकसीत भारत के निर्माण के लिए हर दिल में मोदी हा अनोखा अभियान राबवून साजरा करण्यात आला.
परतूर येथील बालाजी मंदिर संस्थान येथील मैदानावर पोलिस भरतीसाठी ट्रेनिंग घेत असलेल्या तरुण युवकासोबत जॉगिंग करून विकसीत भारत ह्या संकल्पनेवर आधारित चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अभूतपूर्व विकास आणि प्रगतीचा अनुभव घेत आहे, अशी भावना डॉ. मंत्री यांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थीत युवकांसोबत आरोग्य व त्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली व विकसित भारतासाठी हर दिल में मोदी हा संकल्प घेण्यात आला. ह्या अभियानात डॉ. सुधीर आंबेकर, अजित पोरवाल, करण काळे, विजय पवार, महेश गोरे, अनिकेत भोकरे, भागवत राऊत, योगेश सर, लालू काळे, अजय काळे, मंगल पवार, अभिजित जोशी, आनंद कोटेचा, डॉ. शितल लाहोटी, आनंद बगडीया, सखाराम कुलकर्णी, नरेश कांबळे, अमोल अग्रवाल, नरेश सोनवणे, प्रणय मोर, पूनम फुलमाळी, गणेश काळबांडे व युवकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.