श्री समर्थ विद्यालयास वर्ग 10 वी चे पुस्तक संच भेट
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
परतूर तालुक्यातील पाटोदा माव येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सिटी हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ.सत्यानंद कराड व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ संध्याताई कराड यांनी पुस्तकांचे संच भेट दिले.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले.
या विषयी डॉ.कराड यांनी सांगितले की ग्रामीण भागामध्ये असे अनेक विद्यार्थी असतात की ते केवळ पुस्तकांचे संच विकत घेऊ शकत नाहीत त्यामुळे इच्छा असूनही अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात असे होऊ नये म्हणून समाजातील अनेक दानसुर व्यक्तीने पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे.
यावेळी परतुर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.संध्याताई कराड , अमित लॅबोरेटरीचे संचालक अंगद नवल ,पाराजी रोकडे,सी.एन.खवल , पांडुरंग डवरे यांची उपस्थिती होती.
या वेळी शाळेच्या वतीने डॉक्टर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.