परतुर येथील विवेकानंद प्राथमिक व माध्य.शाळेमध्ये 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.


परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
परतुर येथील विवेकानंद इंग्रजी शाळेमध्ये 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग विषयीचे महत्त्व योगशिक्षक श्री गजानन वायाळ यांनी विशद केले. योगसाधनेचे मूळ उगम स्थान भारत देश आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना जर योगाच्या अभ्यास करण्यास गोडी लागली,योगाभ्यास जर करू लागले तर निश्चितपणे राग, द्वेष, चिडचिडपणा,नकारात्मक मानसिकता या बाबी विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणार नाहीत तेव्हा ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्त्व पटवून देणे ही काळाची गरज आहे.यावेळी सर्व मुलांचे शारीरिक व्यायाम व हालचाली योगासने सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी सहभागी होऊन योग दिवस साजरा केला.यावेळी उपस्थित शाळेचे अध्यक्ष डॉ शेषराव  बाहेकर, मुख्याध्यापिका संगीता शिंदे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.
दरम्यान विवेकानंद इंग्रजी शाळेमध्ये विविध व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी विविध कार्यक्रम ,ऍक्टिव्हिटी होत असतात त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय योग दिवस देखील अतिशय उत्साहामध्ये साजरा केला.दरम्यान भारताने जगाला दिलेली ही देन आहे, योगामुळे मन प्रसन्न होते. काम करण्यास ऊर्जा मिळते. ताण-तणावाने धावपळीच्या जीवनामुळे हृदयविकारासह अनेक आजार माणसांना जडले जातात यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आनंदी राहणे गरजेचे आहे. तणावमुक्त जीवनासाठी योगा अत्यंत गरजेचे आहे.म्हणून प्रत्येकाने वेळ काढून योगा करत आनंदी जीवन जगा, मस्त रहा स्वस्थ रहा, जबरदस्त राहण्याचा सल्ला यावेळी योगशिक्षक गजानन वायाळ यांनी दिला.
दरम्यान योगशक्तीमुळे सकारात्मक मानसिकता होते शरीरामध्ये एक नवचैतन्य आणि ऊर्जा प्राप्त होते विचार कृती शुद्ध होतात समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन योगामुळे शक्य आहे योग आपल्याला वर्तमान क्षणांमध्ये राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी मदत करत असल्याचे यावेळी योग दिनाच्या निमित्ताने शाळेचे अध्यक्ष डॉक्टर शेषराव बाहेकर यांनी सांगितले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड