किर्तनकेसरी हभप साहेबराव महाराज कोठाळकर अनंतात विलिन,अंत्य दर्शनाला लोटला मोठा जनसमुदाय


जालना प्रतिनिधी समाधान खरात

घनसावंगी तालुक्यातील कोठाळा येथील सुप्रसिध्द कीर्तनकेसरी भारतीदास हभप साहेबराव साबळे महाराज कोठाळकर हे अनंतात विलिन झाले आहे.

हभप साहेबराव महाराज कोठाळकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 110 व्या वर्षी दि २६ जुन २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राहत्या घरी प्राण ज्योत मालवली. त्याच्यावर दि २७ जुन रोजी सकाळी दहा वाजता मूळ गावी कोठाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी टाळ मृदुंगाच्या जयघोषात अंतिम संस्कार करण्यात आले.
जालना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठा जनसमुदाय भक्तगण अंत्य दर्शनाला उपस्थित होता. हभप रूपालीताई सवणे, बळीराम बाबा घोंसीकर, तुकाराम महाराज सांगवीकर दत्त संस्थान सावंगी, नामदेव महाराज फपाळ, बाळू महाराज गिरगावकर, चांगदेव महाराज काकडे, बळीराम महाराज आवटे, महादेव महाराज गिरी, राजेंद्र महाराज वाघमारे, राम महाराज काजळे, तुकाराम महाराज राठोड, पांडुरंग महाराज आनंदे, हभप लक्ष्मण महाराज आनंदे,
माजी मंत्री अर्जुन खोतकर, मनिषा टोपे, पंकज बोराडे, बळीराम कडपे, पंडित भुतेकर, लक्ष्मण वडले, तसेच परतूर, अंबड, कु.पिंपळगाव, घनसावंगी, जालना येथील प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर, वकील, व्यापारी, शिक्षक, राजकीय, महाराज मंडळी, नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड