परतुर येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील सन 1998- 99 या वर्षातील दहावी बॅचचे स्नेह मिलन संपन्न
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतुर येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील सन 1998- 99 या वर्षातील दहावी झालेले विद्यार्थी सर्व वर्गमित्र व शाळेत शिकवणारे शिक्षक स्नेहमिलनाच्या कार्यक्रमातून एकत्र आले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी 25 वर्षांपूर्वींच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी शाळेत शिकवणारे शिक्षक वृंद उपस्थित होते शिक्षक सेवानिवृत्त झालेले असले तरी त्यांना बोलवून त्यांचा आहेर व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या शिक्षकांमध्ये पाठक सर, सरफराज कायमखानी सर, इंगळे सर, नंद सर, जायभाये सर, देशपांडे सर,तायडे सर, खतीब सर, भराडे मॅडम, आत्ता कार्यरत असलेले मुख्याध्यापक राठोड सर व आठवे सर यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दल काही जुन्या आठवणींना उजळा दिला . व शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्याबद्दल बऱ्याच गोष्टींना, आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमांमध्ये काही विद्यार्थी आपल्या देशासाठी सेवा करून आलेले प्रशांत पुरी, राजेंद्र सोनटक्के भीमराव चाफे व तसेच काही उच्च पदावर गेलेले पीएचडी झालेले एकनाथ जाईद इजाज अली, डॉ. मुनीर कादरी अशा बऱ्याच जणांचा गुरुजनांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण मुंदडा, गणेश कानडे गणेश ओझा, सत्यम अग्रवाल ,श्रीपाद तरासे, प्रशांत पुरी, व शिवनंदा कवडे यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाठक सर तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्व शिक्षक वृंद होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद तरासे यांनी केले तर आभार नारायण मुंदडा यांनी मानले.