साप्ताहिक वृत्तपत्रांच्या विविध मागण्यांसाठी 4 जुलै रोजी निवेदन देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे-विकासकुमार बागडी


जालना- प्रतीनिधी समाधान खरात
  मागील अनेक वर्षांपासून या स्थानिक वर्तमानपत्रांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे साप्ताहिकांच्या विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या वतीने राज्यभरात दि. 04 जुलै रोजी निवेदन देण्यात येणार असून यावेळी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन  व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंग महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विकासकुमार बागडी यांनी केले आहे.
जालना जिल्ह्यातही 04 जुलै रोजी व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या वतीने सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणेच साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे,  साप्ताहिक वृत्तपत्राची द्वीवार्षिक पडताळणी पाच वर्षात करा, साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी, अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी, रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना शंभर टक्के सवलत सुरू करावी, पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफतमध्ये उपचाराची सवलत देण्यात यावी, आर एन आय कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. जिल्ह्यातील सर्वसाधारण पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात यावे व कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, इच्छूक व गरजवंत पत्रकारांना हमखास शस्त्र परवाना देण्यात यावा, सर्वसाधारण पत्रकारांच्या पाल्यांना प्राथमिक आणि उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे, जालना जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढली असून पत्रकारांच्या तक्रारीवर तात्काळ दखल घेण्यात यावी, ज्या ज्येष्ट पत्रकारांना तात्काळ पेन्शन सुरु करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत. तरी यावेळी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी राहून आपली समस्या मांडावी, असे आवाहन व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंग महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड