प्रलंबित मागण्यासाठी जालन्यात महसूल कर्मचारी बेमुदत संपावर ,दांगट समितीच्या शिफारशीनुसार संवर्गातील कर्मचार्‍यांची कपात न करता लागू करण्यात याव




जालना प्रतिनिधी समाधान खरात 
आकृतीबंधाच्या दांगट समितीच्या शिफारशीनुसार संवर्गातील कर्मचार्‍यांची कपात न करता लागू करण्यात यावी, या मागणी सह अनेक मागण्या करीता जालन्यात आजपासून महसूल कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत..  आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातील नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीचे आदेश द्यावेत..यासह इतर मागण्यांसाठी आज पासून महसूल कर्मचारी वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचारी यांनी आंदोलनाचे हत्यार उपसलेय. दरम्यान आता या बेमुदत संपामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कामांचा खोळंबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संपकरांनी आपल्या प्रमुख मागण्या महसुल विभागचा सुधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा, अव्वल कारकुन/मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेते, महसुल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करुन पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसुल कर्मचारी यांना महसुल विभागात सामावून घेण्यात यावेते, वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन  निर्णय निर्गमित करण्यात यावा, महसुल सहाय्यकाचा ग्रेडपे 1900 वरुन 2400 करण्यात यावा, महसुल सहायक व तलाठी यांना सेवाअंतर्गत एकसमान परिक्षा पध्दती लागू करण्यात याव्यात, महाराष्ट्र शासन, वित्त विभाग यांची अधिसुचना दिनांक 03.02.2023 नूसार तात्काळ अव्वल कारकुन यांची वेतन निश्चिती करण्यात यावी, महसुल सहाय्यकाची सेवा जेष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसुल अर्हता परीक्षा नियम 1999 मधील तरतूदीनूसार तयार करण्यात यावी, महसुल विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची सेवापुस्तिका लेखाधिकारी वेतन पडताळणी पथका ऐवजी समकक्ष असलेल्या महसुल विभागातील नियुक्त लेखाधिकारी यांचे वेतन पडताळणीचे अधिकारी मार्फत
करण्यात यावी, अव्वल कारकुन यां संवर्गाचे पदनाम बदलून सहाययक महसुल अधिकारी असे करण्यात यावे, नायब तहसिलदार संवर्गाचा गेड वेतन 4800 करण्यात यावा. अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर अदला बदली धोरणास नूसार पदस्थापना देण्यात यावी,  नायब तहसिलदार पदासाठी अव्वल कारकून/मंडळ अधिकारी यांचेकरीता पदोन्नती विभागीय परीक्षा सरळसेवा याबाबतचे प्रमाणे 70:10:20 असे करण्यात यावे, चतूर्थश्रेणी/शिपाई कर्मचा-यांना पदोन्नती देत असतांना तलाठी संवर्गामध्ये 25% पदोन्नती देण्यात यावी, कोतवाल पदांना चतूर्थश्रेणी - ड दर्जा देण्यात यावा व कोतवाल पदोन्नती कोटा वाढविण्यात यावा. या मागण्याघेऊन आंदोलन आजपासुन सुरू केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड