Posts

Showing posts from August, 2024

मतदातसंघात जेथलिया यांच्या माध्यमातून कॉंग्रेसमय वातावरण- खा.कल्याणराव काळे.,नागरी सत्कार कार्यक्रमात सुरेशकुमार जेथलिया यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत अनेक भाजप च्या मातब्बर नेत्यांनी केला कॉंग्रेस पक्षात प्रवेश

Image
आष्टी प्रतिनिधी   परतूर – मंठा मतदार संघात मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या माध्यमातून कॉंग्रस चे प्रचंड वातावरण असून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचाच आमदार असेल असे प्रतिपादन जालना जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी केले. मा.आ.सुरेश जेथलिया यांच्या नेतृत्वात परतूर-मंठा-नेर सेवली कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आष्टी या ठिकाणी आयोजित नागरी सत्कार व प्रवेश सोहळा निमित्त ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जालना जिल्हा प्रभारी मा.आ.नामदेवराव पवार,आ.कैलास गोरंटयाल,जिल्हा अध्यक्ष राजेभाऊ देशमुख,राजेंद्र राख,शेख महेमूद,प्रभाकर मामा पवार,बालासाहेब आकात,किसनराव मोरे,पांडू आबा सोळंके,अण्णासाहेब खंदारे,बाबाजी गाडगे,शामसुंदर काळे,सुभाष मगरे,बद्रीभाऊ खवणे,एजाज जमीनदार,इंद्रजीत घनवट,हाजी रहेमत खान,शाखेर मापेगावकर, जगन लाटे,सुखलाल राठोड,संतोष दिंडे, दादारावजी खोसे,योगेश पा.अवचार,सूर्यभान मोरे,मंजुळदास सोळंके,परमेश्वर आबा सोळंके,पांडुरंग कुरधने,आणिकराव डवले,सुरेशजिजा सवने,सिद्धेश्वर अंभुरे,विकास खुळे,पंजाबराव देशमुख,सादेक जाहगिरदार,अजीम कुरेशी,मोसिन जमीनदार,आसेफ जमीनदार,मोईन से

न्यू वंडर इंग्लिश स्कूलचे तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत घवघवीत यश

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  दिनांक 30 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार रोजी देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत न्यू वंडर इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले  14 वर्षाखालील मुले गटात सर्वेश जगताप, मयूर शेरे, रविराज गोलांडे ,यांची निवड झाली . तर 14 वर्षे मुली मध्ये संस्कृती झरेकर ,जानवी बरकुले, ईश्वरी झरेकर, कार्तिकी धुमाळ ,रुचिता नवल या विद्यार्थ्यांनीही यश मिळवले आहे. तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या गटांमध्ये कार्तिकी शेरे व आस्था संघई यांनी क्रमांक मिळवला आहे . वरील सर्व विद्यार्थ्यांची भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय जालना येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे . या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नारायण सोळंके, कार्याध्यक्ष गणेश सोळंके, सचिव छाया बागल, प्राचार्य साम वर्गीस, गोविंद पाठक, क्रिडा शिक्षक विजय चव्हाण, संतोष हरकळ, महादेव कदम, बाळाभाऊ बिडवे, प्रशांत वेडेकर, निवृत्ती बिडवे, लिनामोल साम, सुरेखा ताजी, पुजा मोरे, मनीषा मोरे, मिना पांडूळे, प्रियंका बंड, राधिका चव्हाण, प्रगती वेडेकर, आणि नम्रत

सुसाट वेगाने येणार्या स्वीप्ट डीझायरचा अपघात दोन जखमी

Image
तळणी  प्रतिनिधी रवी पाटील  मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने तळणी येथे स्वीप्ट डीझायरचा अपघात ( साय काळी ८ : ३०च्या दरम्यान  ) होऊन नायगाव ( ता मंठा ) येथील बाळू फुफाटे वाहन चालक व अन्य एक साथीदार जखमी झाला सविस्तर वृत्त असे की नायगाव येथील चार व्यक्ती दोन महीलेसह दवाखान्याच्या निमित्याने विदर्भातील मेहकर येथे गेले होते . तळणी बस स्टँन्ड परिसरात काही साहीत्य घेण्यासाठी वाहनचालकाने गाडी बाजूला उभी केली गाडी मध्ये बसलेल्या बाळू फुफाटे याने   दारूच्या नशेतच गाडीचा ताबा घेतल्यानंतर चौकातील डीव्हायड्रर टाकली गाडीत बसलेल्या महीलांनी ओरडण्यास सुरवात केल्याने त्याने कशी तरी गाडी बाजुला केल्यानंतर भर चौकातुन अनेकांना चकवत श्री संत नेमीनाथ महाराज मंदीराजवळील विद्यूत पूरवठा  करणार्या मेन लाईनच्या खांबांना धडकून खड्डात पडली गाडीतील दोन ऐअर बॅंग उघडल्याने जीवीत हानी झाली नाही विद्यूत खांबांला गाडी धडकल्याने आवाज होऊन विद्यूत पूरवठा खंडीत झाला . आवाज मोठा आल्याने श्री संत नेमीनाथ महाराज सस्थानचे ह भ प अर्जुन महाराज बादाड यानी ग्रामस्थानां फोन वरून कळवली ग्रामस्थाच्या मदतीने सर्वाना बाहेर काढल्यानंतर

देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण     दि.30 ऑगस्ट वार शुक्रवार रोजी महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक संचनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे तालुकास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.    कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक  संतोष  चव्हाण हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जयकुमार तीमोथी, परतुर तालुका माजी क्रीडा संयोजक सरफराज कायमखानी, तालुका क्रीडा संयोजक प्रमोद राठोड, ज्येष्ठ शिक्षक  हरकळ सर यांची उपस्थिती होती . 14 वर्षाखालील मुलांमध्ये, नामदेव अर्जुन वाघमारे, विशाल शिवानंद कुकडे, शुभम शिवाजी चव्हाण त्यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवून भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय जालना येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, परतुर तालुका क्रीडा अधिकारी डॉ.रेखा परदेशी, संस्थेचे संचालक संतोष  चव्हाण, संस्थेचे संचालक सुबोध  चव्हाण, माजी क्रीडा संयोजक सरफराज कायमखानी, परतुर तालुका क्रीडा संयोजक प्रमोद राठो

तळणी जि प हायस्कूल्याच्या आठ विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धसाठी निवड

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  तळणी येथील शालेय कुस्ती स्पर्धतून जिल्हास्त कुस्ती स्पर्धसाठी जि प हायस्कुल तळणी येथील आठ विद्यार्थ्योची निवड करण्यात आली नुकत्याच झालेल्या तळणी येथे  तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या या स्पर्धतूनच या विद्यार्थोची निवड करण्यात आली तळणी येथे कुस्ती खेळाचे विशेष आकर्षन असुन राज्यातील विविध भागातील प्रसीध्द आखाड्यात अनेक तरुन कुस्तीचे डावपेच शिकत आहे तळणी येथे सुध्दा  स्वतंञ आखाडा असुन या विद्यार्थ्यान स्वतञ प्रशिक्षक व तालुका क्रिडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे आजच्या निवडी मुळे विद्यांथ्र्याचे सरपंच गौतम सदावर्ते उपसरपंच विश्वनाथसिह चदेल राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष्य ज्ञानेश्वर सरकटे मुख्याध्यापक आर एल चव्हाण क्रीडा शिक्षक जी पी राठोड ए बी पंडागळे जी एन गवई शालेय शिक्षण समीतीचे अध्यक्ष्य पांडूरंग जनकवार यानी शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हास्तरावर यश मिळावे यासाठीची तालीम आजपासुनच सुरु करण्यात आली   .१)  रुषीकेश येऊल  14 वर्षा खालील 35 किलो वजन गटात प्रथम      2) रोहन सरकटे 14 वर्षा खालील  38 वजन गट 3) यश हनवते 14 वर

सोपान शास्त्री सानप यांचा हितोपदेश संत श्री जनार्धन महाराज याच्या दरबारात हजारो भावीकांची मांदीयाळी;श्रावण मासानिमित्य नळडोह येथे कार्यक्रम

Image
तळणी प्रतिनिधी  रवि पाटील    देव हा दाता असतो संत हे ज्ञाते असतात आणि मनुष्य हा मागता असतो .ज्याला देता येते त्याला देव म्हणतात ज्याला सांगता येते ते संत असतात पण ज्याला ऐकता येते तो मनुष्य असतो पण . फक्त ऐकुन कृती करणारा मनुष्य कामाचा नाही मनाभावातून कृती करणारा व सात्विक भावनाचे आचरण प्रत्यक्षात उतरवणारा असेल तर तो मनुष्य भगवत भक्तीच्या योग्यतेचा असू शकतो असे प्रतिपादन ह भ प सोपान शास्त्री सानप यानी नळडोह  येथे केले श्री संत जनार्धन महाराज यांच्या दरबारात होत असलेल्या श्रावण मासानिमित्य होत असलेल्या  किर्तन सेवेप्रसगी केले श्री संत तुकोबाराय  यांच्या सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया या अभंगावर चिंतन केले  मनुष्याचा फक्त आकारच मनुष्याचा आहे पण त्याची चित्तवृत्ती मात्र ही प्रापंचीक आहे प्रापचीक वॄती ही कधीच उध्दाराचा आधार होउ शकत नाही कारण त्याच्यात स्वार्थ आहे स्व :त पूरते पाहण्याची वृत्ती ही मनुष्याच्या हिताचे नसल्याने त्याने वरवर कितीही देव धर्म केला तरी त्याचा उपयोग नाही कारण त्देवाला भक्ती ही मनाभावातुन प्रिय आहे .  ज्या मनु

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची विभागीय आट्या-पाट्या स्पर्धेसाठी निवड.

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य आयोजीत  राज्यस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा आट्या-पाट्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज परतूर संघाची विभागीय स्तरावर निवड झाली. झालेल्या निवडी बद्दल संस्थे तर्फे विद्यार्थी व क्रिडा शिक्षक विजय चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. सत्करा प्रसंगी कार्याध्यक्ष म्हणाले की, आपली कामगिरी  पाहून आम्हा सर्वांना आपला खुप अभिमान वाटत आहे अशीच कामगिरी करत आपण प्रत्येक यशाचे शिखर गाठीत जावे व आपणास पुढील वाटचालीस शभेच्छा.      यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण  सोळंके, संस्थेचे कर्याध्यक्ष गणेश सोळंके, संस्था सचिव छाया बागल, मुख्याध्यापक साम वर्गीस, क्रिडा शिक्षक विजय चव्हाण व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते व सर्वांनी पुढील वाटचालीसाठी आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विकासकुमार बागडी यांची व्हाईस ऑफ मिडीयाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

Image
जालना  प्रतिनिधी समाधान खरात    व्हाईस ऑफ मिडियाच्या साप्ताहिक विंगसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीमध्ये राज्यभरातील पदाधिकारी आणि पत्रकारांनी मतदान केले असून सदर निवडणूकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. प्रदेश अध्यक्ष म्हणून रोहित जाधव (सांगली), प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून अब्दुल कयुम (छत्रपती संभाजीनगर), सरचिटणीस वामन पाठक (लातूर) तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जालन्याचे पत्रकार विकासकुमार बागडी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. सदर निवडणूक व्हाईस ऑफ मिडियाचे संदीप काळे यांच्या संकल्पनेनुसार मार्गदर्शक ठरली. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. संजीवकुमार कलकोरी व राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोडकर यांनी काम पाहिले. निवडणूक यशस्वीतेसाठी प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के, विजय चोरडिया, विनोद बोरे, दिव्या पाटील,गणेश शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. या निवडीबद्दल विकासकुमार बागडी यांचे व्हाईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे,  राजेश भालेराव, बाबासाहेब कोलते, रवि दानम, कैलास फुलारी, अहेमद नूर,  गोविंदप्रसाद मुंदडा, लियाकत अली खान, आकाश मुंदडा, साहिल पाटील, अंकुश देशमुख, लक्

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण जुन्या आठवणींना उजाळा देत लाल बहादूर शास्त्री विद्यालय, परतूर 2004 च्या दहावी ‘ब’ बॅच तर्फे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा दिनांक 18.08.2024 रोजी हॉटेल कृष्ण मोती येथे आयोजित करण्यात आला होता. तब्बल 20 वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले होते. बालपणीच्या आठवणीत रमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुललेले दिसत होते.  उपस्थित सर्वांचे पारंपरिक पद्धतीने फेटे बांधून स्वागत करण्यात आले. शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दिवंगत शिक्षक आणि दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात  आली. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.    तद्नंतर माजी विद्यार्थ्यांनी आपला वैयक्तिक परिचय करून दिला. अनेकांनी आपल्या शैलीत तर कोणी मिश्किल पणे जुन्या आठवणींना उजाळा दिला. मूळचे परतूरचे परंतु सध्या नौकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले विद्यार्थी आपल्या जुन्या मित्रांच्या भेटीच्या ओढीने परतूर मध्ये परतले होते. या निमित्य

परतूर सकल मातंग समाजाच्या वतीने अविनाश खंडागळेला श्रद्धांजली अर्पण...

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण दिनांक १ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं ऐतिहासिक निर्णय देत sc/st प्रवर्गात वर्गीकरण करण्यास मान्यता दिली होती या अनुषंगाने राज्य शासनाने तात्काळ राज्यात  आरक्षण वर्गीकरण लागू करायला हवे होते परंतु शासनाच्या आणि विरोधी पक्षांच्या उदासीन धोरणामुळे आरक्षण वर्गीकरनास विलंब लागत आहे या कारणाने दिनांक २५ रोजी धाराशिव जिल्ह्यातील अविनाश खडांगळे या तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील परतूर सकल मातंग समाजाच्या वतीने अविनाश खंडागळे शहीदास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.      अखिल भारतीय मातंग संघ तालुका अध्यक्ष इंद्रजित हिवाळे यांनी शोक व्यक्त करीत बोलतांना म्हंटले की,गेल्या अनेक दाशका पासून मातंग समाजाचा आरक्षण वर्गीकरनाचा प्रश्न प्रलंबित असून याकरीता लोकशाहीच्या माध्यमातून समाजाने राज्यभर शांततेच्या मार्गाने महामोर्चे काढले, विविध मार्गाने आंदोलने केली.वर्गीकरन आरक्षणाची रास्त मागणी मान्य न करता केवळ चालढकल करण्याची  सरकारची आणि विरोधी पक्षांची भूमिका चालू आहे आता ही खेळी आम्ही आता चालू देणार नाही,संयम

प्रहार संगठनेचा जिल्हाधीकारी कार्यालयावर तीरडी मोर्चा

Image
 जालना प्रतिनिधी नरेश आण्णा जालना   लालवाडी या गावात स्मशान भूमी बांधकाम व रस्त्याच्या बांधकामा करिता जालन्यातील प्रहार संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला होता     लालवाडी या गावांमध्ये अजूनही समशानभूमीचे बांधकाम झालेले नसून पावसाळ्यात अंत्यविधीसाठी लोकांना आपल्या शेतात अंत्यविधी करावा लागतो परंतु पावसाळा असल्याने शेताकडे जाणारे सर्व रस्ते चिखलमय झालेले असलेले असतात त्यामुळे लोकांना चिखलातून जावा लागते व अनेक वेळा चिखलात पाय गुडघ्यापर्यंत रूततात याचबरोबर ग्रा मा नंबर 136 व ग्राम नंबर 16 या दोन रस्त्याचे खडी करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळेस निवेदन देऊनही हे रस्ते झालेले नसल्यामुळे गावकऱ्यांना फळबागातील फळे व ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस ने आणण्याकरिता फार मोठी अडचण निर्माण होते या कारणामुळे आज जालन्यातील प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला होता   या मोर्चात लालावडी चे सरपंच प्रदीप शिंदे,प्रहार संघटनेचे जिल्हाध्याक्ष सावलाहरी शिंदे,जालना तालुकाध्यक्ष सुदान इंगोले,जाफराबाद तालुकाध्यक्ष सुनील पंडीत,कृ

जालना स्थानिक गुन्हे शाखाची मोठी कारवाई;टिपकराज बार मधील चोरी प्रकरणी गुन्हेगार जेरबंद

जालना प्रतीनिधी नरेश अन्ना  जालना शहरातील स्थानिक गुन्हे शाखाची मोठी कारवाई जालना जिल्ह्यातील धारकल्याण येथील दीपक राज बारमध्ये चोरी करणारा परभणी येथील  सराईत आरोपीस जेरबंद करून 60,262/- किमतीचा मुद्देमाल केला जप्त....