रामप्रसाद शर्मा यांचे निधन
परतुर : प्रतिनिधी कैलाश चव्हाण
येथील प्रतिष्ठित व्यक्ती तथा फेडरेशनचे निवृत्त कर्मचारी रामप्रसाद शंकरलाल शर्मा वय 78 यांचे अल्पशा आजाराने दिनांक 30 जुलै मंगळवारी पहाटे अडीच वाजता निधन झाले त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
येथील फोटोग्राफर विश्वनाथ शर्मा व संदीप शर्मा यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंड, जावई असा मोठा परिवार आहे.
त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता वैकुंठ धाम या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी परतुर शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर आदीसह आप्तस्वकीय, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.