लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतूर येथील आनंद इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज परतूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी सहशिक्षिका रुपाली भामरे व दिपाली हरजुळे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची माहिती सांगितली,दिड दिवस शाळेत गेलेला व्यक्ती "साहित्यरत्न"होतो,हे प्रेरणा घेण्यासारखे आहे.
लो.टिळकांनीही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मोठं योगदान दिलं आहे.प्रतिकुल परिस्थितीत अनेक ग्रंथ लिहिले.यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, असे विचार यावेळी त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.तसेच साहित्य दिंडीचे आयोजन करून पोलिस स्टेशन चौक, भाजी मंडी, हनुमान मंदिर या ठिकाणी सादरीकरण केले.या पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्मशानातील सोन व पोवाडा (माझी मैना) हे प्रदर्शन करून परतूर या गाव भागा मधे जाऊन चौका मधे याचे प्रदर्शन केले .
यावेळी मुख्याध्यापक नारायण सागुते यांनी मार्गदर्शन केले तसेच पर्यवेक्षक विकास काळे, सहशिक्षक सचिन नंदिकोले , नितीन हिवाळे, दिपाली हरजुळे, शितल खरे, उषा मगर , शिवकन्या बाहेकर, सोनू यादव , अर्चना वरखडे, रुपाली भामरे , सह सर्व शिक्षक व शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते.