जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुमारी स्नेहल चव्हाण हिचे घवघवीत यश
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि 20 ऑगस्ट वार बुधवार रोजी भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय जालना येथे महाराष्ट्र शासन ,क्रीडा व युवक संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत विवेकानंद इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी स्नेहल संतोष चव्हाण हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे