स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत
जालना प्रतीनिधी नरेश अन्ना
जालना शहरातील अंबड चौफुली भागातील , योगेश नगर येथील चोरी प्रकरणी तालुका पोलीस ठाणे जालना येथे गुरनं.373/2024 कलम 457, 380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदरचा चोरीची घटना 8 जून 2024 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती, सदरचा गुन्हातील आरोपी शोध घेणे बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आननेबाबत सूचना देवून मार्गदर्शन केले, त्या अनुषंगाने दिनांक 20 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नमूद गुन्ह्यातील आरोपी गोपिसिंग प्रल्हाद सिंग टाक या गुन्हेगारास गांधीनगर येथून ताब्यात घेऊन त्याच्या कडे गुन्ह्याच्या चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यात चोरी केलेले तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले
सदर ची कार्यवाही अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपणी यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव , सपोनि योगेश उबाळे , सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनी राजेंद्र वाघ, सोबत पोलीस अंमलदार कांबळे ,कृष्णा तंगे,लक्ष्मीकांत, आडेप, सागर बाविस्कर , सुधीर वाघमारे, संदीप चिंचोले, धीरज भोसले, योगेश सहाने, कैलास चेके, सौरभ मुळे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे,