प्रहार संगठनेचा जिल्हाधीकारी कार्यालयावर तीरडी मोर्चा


 जालना प्रतिनिधी नरेश आण्णा
जालना   लालवाडी या गावात स्मशान भूमी बांधकाम व रस्त्याच्या बांधकामा करिता जालन्यातील प्रहार संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला होता 
   लालवाडी या गावांमध्ये अजूनही समशानभूमीचे बांधकाम झालेले नसून पावसाळ्यात अंत्यविधीसाठी लोकांना आपल्या शेतात अंत्यविधी करावा लागतो परंतु पावसाळा असल्याने शेताकडे जाणारे सर्व रस्ते चिखलमय झालेले असलेले असतात त्यामुळे लोकांना चिखलातून जावा लागते व अनेक वेळा चिखलात पाय गुडघ्यापर्यंत रूततात याचबरोबर ग्रा मा नंबर 136 व ग्राम नंबर 16 या दोन रस्त्याचे खडी करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळेस निवेदन देऊनही हे रस्ते झालेले नसल्यामुळे गावकऱ्यांना फळबागातील फळे व ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस ने आणण्याकरिता फार मोठी अडचण निर्माण होते या कारणामुळे आज जालन्यातील प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला होता
  या मोर्चात लालावडी चे सरपंच प्रदीप शिंदे,प्रहार संघटनेचे जिल्हाध्याक्ष सावलाहरी शिंदे,जालना तालुकाध्यक्ष सुदान इंगोले,जाफराबाद तालुकाध्यक्ष सुनील पंडीत,कृष्णा कल्याण शिंदे,लखन शिंदे,शाम डाळे,जगन्नाथ ठाकूर,भाऊसाहेब शिंदे,तुकाराम जाधव,माऊली घोडके याच्या सह अनेक कार्यकर्तै उपस्थित होते

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात