विश्वनाथ विद्यालयामध्ये वृक्षारोपण संपन्न
तळणी प्रतीनीधी रवी पाटील
तळणी येथे विश्वनाथ विद्यालयामध्ये आज वृक्षारोपण करण्यात आले एक वृक्ष एक जीवन या दिव्य मराठीच्या उपक्रमाचे औचित्य साधून व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांच्या वाढदिवसाच्याएकwनिमित्ताने गावातील तीनही शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिक्षकांनी झाडांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पीसी लावलेले झाड याचे संगोपन कसे होईल याची काळजी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला सरपंच गौतम सदावर्ते विश्वनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लोडे सर शिक्षक गण व अन्य कर्मचारी उपस्थित होते असाच कार्यक्रम केंद्रीय प्राथमिक शाळा तळणी येथे सुद्धा घेण्यात आला