देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये रक्षा बंधन उत्साहात
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि 19 ऑगस्ट वार सोमवार रोजी देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा .या सणाला बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्याविषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करते. याचेच औचित्य साधून देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल मधील इयत्ता नर्सरी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी आपल्या भावांना राखी बांधून हा सण साजरा केला.
यावेळी शाळेचे संचालक सुबोध चव्हाण, शाळेच्या संचालिका श्रीमती भाग्यश्री चव्हाण, प्राचार्य जयकुमार तीमोथी, सहशिक्षक गजानन कुकडे, रमेश कदम, शाहीर शेख, श्रीमती वंदना ककरीये, श्रीमती स्वाती , काळे, मनीषा लहाने, शिबा, काजी, श्वेता पाठक, निकिता कदम, अश्विनी डोंबाळे, त्रिवेणी गिरी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.