समर्थ विद्यालयात रानभाज्या महोत्सव साजरा.

परतुर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
   पाटोदा(माव) येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
     निसर्ग प्रत्येक ऋतुमधे अत्यंत पौष्टिक अशा भाज्या - फळांची निर्मिती करीत असतो. आपल्या पुर्वजांना त्या भाज्या , फळांचे महत्व माहीत होते. ऋतुप्रमाणे भाज्यांचे सेवन केल्या जात होते.

सांप्रत काळात या रानभाज्यांची ओळख नाहीशी होत आहे. त्या सर्व भाज्यांची माहीती तसेच त्यांचे औषधीय गुणधर्म विद्यार्थ्यांना माहित व्हावेत या साठी सदरील महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी सांगितले.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी ऊत्साहाने सहभाग घेतला.
 रानभाजी तिचे वैज्ञानिक नाव , आढळ , गुणधर्म ई. माहीतीप्रद पलक तयार करण्यात आलेले होते.
केंद्रप्रमुख श्री शंकर थोटे यांनी ऊपक्रमाचे कौतुक केले व प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणलेली रानभाजी  ची माहिती करुन घेतली.

याच कार्यक्रमात अगस्त्या फौंडेशनचे श्री राठोडसर व केंद्रप्रमुख श्री थोटेसर यांचे हस्ते बालविवाह प्रतिबंध दुरध्वनी मदत फलकाचे अनावरण करण्यात आले.

दरम्यान भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमास विद्यार्थी व सर्व कर्मचारी ऊत्साहाने सहभागी झाले होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....