सोपान शास्त्री सानप यांचा हितोपदेश संत श्री जनार्धन महाराज याच्या दरबारात हजारो भावीकांची मांदीयाळी;श्रावण मासानिमित्य नळडोह येथे कार्यक्रम


तळणी प्रतिनिधी रवि पाटील 
  देव हा दाता असतो संत हे ज्ञाते असतात आणि मनुष्य हा मागता असतो .ज्याला देता येते त्याला देव म्हणतात ज्याला सांगता येते ते संत असतात पण ज्याला ऐकता येते तो मनुष्य असतो पण . फक्त ऐकुन कृती करणारा मनुष्य कामाचा नाही मनाभावातून कृती करणारा व सात्विक भावनाचे आचरण प्रत्यक्षात उतरवणारा असेल तर तो मनुष्य भगवत भक्तीच्या योग्यतेचा असू शकतो असे प्रतिपादन ह भ प सोपान शास्त्री सानप यानी नळडोह  येथे केले श्री संत जनार्धन महाराज यांच्या दरबारात होत असलेल्या श्रावण मासानिमित्य होत असलेल्या  किर्तन सेवेप्रसगी केले श्री संत तुकोबाराय  यांच्या सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया या अभंगावर चिंतन केले 
मनुष्याचा फक्त आकारच मनुष्याचा आहे पण त्याची चित्तवृत्ती मात्र ही प्रापंचीक आहे प्रापचीक वॄती ही कधीच उध्दाराचा आधार होउ शकत नाही कारण त्याच्यात स्वार्थ आहे स्व :त पूरते पाहण्याची वृत्ती ही मनुष्याच्या हिताचे नसल्याने त्याने वरवर कितीही देव धर्म केला तरी त्याचा उपयोग नाही कारण त्देवाला भक्ती ही मनाभावातुन प्रिय आहे . 
ज्या मनुष्याचा साधा हरीपाठ पाठ नाही भजन नाही कुठली किर्तन सेवा नाही आचरणात सात्वीकता नाही अशा मनुष्याचा उपयोग काय . मनुष्याला या कलयुगात स्वःतचा उध्दार करायचा असेल तर त्याला भगवत भक्ती शिवाय पर्याय नाही जगद गूरू तूकोबाराय ज्ञानेश्वर माऊली यांचा त्याच्या अध्यात्मीक साधने मध्ये किती मोठा सघर्ष आपण बघतो किती मोठा . त्याग अनेक संताच्या जीवनात आल्यामुळेच त्याना संतपद मिळाले 
आज काल व्रतवैकल्य म्हंटले की मनुष्याला नकोसे वाटते पंधरा दिवसातून एक एकादाशी असावी गाथा ज्ञानेश्वरी चिंतन असावे पंढरपूरची वारी असावी आई वडीलांची सेवा असावी तरच या नरदेहाचा काहीतरी उपयोग होऊ शकेल  नाही तर आपल्य या नरदेहाचा उपयोग काय .

अहकांर रुपी मनुष्याची अधोगती ही अटळ आहे अहकार हा भक्तीचा असावा . निडर निस्वार्थ प्रेमळ भक्तीमुळे भक्त प्रल्हादाचा उध्दार झाला .

मनुष्यच्या आयुष्यात परमार्थीक साधना नसेल तर या जन्मात येऊन धन्यता कशी मानायची गळयात पवीञ तुळशी माळ नाही आणि धन्य आम्ही जन्मा आलो हे कोण्या आधिकाराने म्हणायचे 

संत तुकोबाराय भगवंता विषई चे भक्ती भाव या  अभंगातुन व्यक्त करत असताना  त्या भक्तीचा  आरंभ सागतात देवाशी मनुष्य जर एकरुप झाला तर त्या मनुष्याला त्याच्या भक्तीशिवाय काही आठवेल़ का भगंव तांला मनोभावे केली साधनाच प्रिय असते व त्या पाहण्याचा आरभ कानाच्या माध्यमातुन एकण्याचा आरंभ जीभेचा रंस घेण्याचा आंरभ नाकांचा गंध घेण्याचा आरंभ आणि त्वचेचा स्पर्श करण्याचा असे अनेक आरंभ मनुष्याच्या जीवनात असताना परमार्थीक साधनेचा आरंभ हा मनुष्य जन्माच्या उध्दाराचा आरंभ असल्याचे प्रतिपादन ह भ प . सोपान शास्त्री सानप यानी नळडोह येथे केले श्री संत जनार्धन  महाराज याच्या समाधी मदीर परीसरात श्रावण मासा निमीत्य चालू असलेल्या सप्ताह प्रसंगी ते बोलत होते

आपली सनातन सस्कृती खुप चागली आहे तीला जपा आपला आदर्श असलेला भगवा ध्वज त्याच्या छञछायेखाली आपले व त्या भगव्याचे  आस्तीत्व अबाधीत ठेवण्यासाठी एक संघ राहा कोणाचा द्वेश मत्सर करण्यात वेळ घालवू नका वेळ  मिळेल तेव्हा धर्मासाठी काम त्याची खरी गरज आज आहे असे महाराजांनी शेवटी सांगीतले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड