न्यू वंडर इंग्लिश स्कूलचे तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत घवघवीत यश


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
दिनांक 30 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार रोजी देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत न्यू वंडर इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले 
14 वर्षाखालील मुले गटात सर्वेश जगताप, मयूर शेरे, रविराज गोलांडे ,यांची निवड झाली . तर 14 वर्षे मुली मध्ये संस्कृती झरेकर ,जानवी बरकुले, ईश्वरी झरेकर, कार्तिकी धुमाळ ,रुचिता नवल या विद्यार्थ्यांनीही यश मिळवले आहे. तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या गटांमध्ये कार्तिकी शेरे व आस्था संघई यांनी क्रमांक मिळवला आहे . वरील सर्व विद्यार्थ्यांची भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय जालना येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे . या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नारायण सोळंके, कार्याध्यक्ष गणेश सोळंके, सचिव छाया बागल, प्राचार्य साम वर्गीस, गोविंद पाठक, क्रिडा शिक्षक विजय चव्हाण, संतोष हरकळ, महादेव कदम, बाळाभाऊ बिडवे, प्रशांत वेडेकर, निवृत्ती बिडवे, लिनामोल साम, सुरेखा ताजी, पुजा मोरे, मनीषा मोरे, मिना पांडूळे, प्रियंका बंड, राधिका चव्हाण, प्रगती वेडेकर, आणि नम्रता खंदारे व इतर कर्मचारी वृंदानि अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड