टी.बी मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरोग नियंत्रण आरोग्य विभागा मार्फत टी.बी मुक्त नायगाव करणारा-सरपंच अविनाश राठोड ,नागपूर क्षयरोग नियंत्रण टीम चा नायगाव येथे अभिनव उपक्रम 230 चा वर रुग्णांची केली एक्स-रे ची तपासणी
तळणी प्रतीनीधी रवी पाटील
मंठा तालुक्यातील (दि.०१सप्टेंबर २०२४) टी.बी मुक्त भारत अभियानांतर्गत
नागपूर क्षयरोग नियंत्रण विभागा मार्फत टी.बी मुक्त अभियान महाराष्ट्र भर चालू आहे. तालुक्यातील नायगाव येथे नागपूर क्षयरोग नियंत्रण विभाग आणि प्राथमिक उपकेंद्र दहिफळ खंदारे आरोग्य विभागा मार्फत ""एक्स-रे"" तपासणी आणि औषधोपचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच श्रीमती.चंद्रकला सूर्यवंशी ,पोलीस पाटील नारायण फुफाटे,मा. सरपंच अविनाश राठोड, उपसरपंच नामदेव फुफाटे, ग्रामसेवक राहुल सूर्यवंशी, बाबासाहेब गवळी यांच्या अनुषंगाने रिबीन कापून,ज्येष्ठ नागरिक खुशाल राठोड यांच्या हस्ते नारळ फोडून आणि गजानन महाराज की जय या घोषणेने करण्यात आले.
या अभियाना प्रसंगी मा.सरपंच अविनाश राठोड यांनी बोलताना टी.बी मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरोग नियंत्रण आरोग्य विभागा मार्फत संपूर्ण नायगाव हे टीबी मुक्त करणार असून या शिबिरा मार्फत ज्या रुग्णांची तपासणी मध्ये प्राथमिक लक्षणे आढळली आहे.त्यांच्यावर त्वरित योग्य ते प्राथमिक उपचार आणि पक्का इलाज दहिफळ खंदारे आरोग्य उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि सहकार्याने नियमित औषध उपचारासाठी प्रयत्न करू असे त्यांनी या वेळी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छता, समजदारी आणि औषध उपचाराने अशा अनेक क्षय रोगावर आळा घालता येतो. शेवटी त्यांनी अभियानासाठी विशेष मदत केल्याबद्दल दूरध्वनीद्वारे वैद्यकीय अधिकारी योगेश राठोड यांचे धन्यवाद मानले.
या अभियानामध्ये दहिफळ खंदारे,देवगाव खवणे,गारटेकी, तळेगाव,दहा , के.वडगाव,नायगाव इतर गावांनी सहभाग नोंदविला होता.
उपक्रम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आरोग्य सहाय्यक इकडे,आरोग्य सेवक प्रवीण घुले,प्रसाद शिरसागर, दिपाली बनसोडे, वाहन चालक विनोद खंदारे, आरोग्य सेवक मुळीक, रघुनाथ कोकाटे आणि लखन राठोड ई. कर्मचाऱ्यांची मदत मिळाली.
जवळपास २३० च्या वर नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी करण्यात आली.सर्व रुग्णांना सरपंच चंद्रकला सूर्यवंशी यांच्या मार्फत बिस्किट आणि पाणी देण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये आशा उर्मिला सांगळे ,सीमा सांगळे ,अलका खवणे, उषा राठोड ,मीना नाईक सीमा येवले ,भागुबाई घुगे इतरांचे महिला भगिनींचे विशेष सहकार्य मिळाले.