शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप, काँग्रेस आय, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला
परतुर/( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण
तालुक्यातील आसनगाव येथील भारतीय जनता पार्टी,काँग्रेस आय,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, व इतर पक्षांच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेत परतुर येथील जिल्हा संपर्क कार्यालयात जाहीर प्रवेश केला.
अग्रवाल यांनी परतुर विधानसभा मतदार संघात केलेल्या विकास कामाचा लावलेला सपाटा पाहता आमच्याही गावात विकास कामे व्हावेत या दृष्टीने आसनगाव येथील अनेक नागरिकांनी इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले, तालुकाप्रमुख अमोल सुरुंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव तरवटे,संघटक विजयकुमार गिरी, युवासेना तालुकाप्रमुख अविनाश कापसे, उपतालुकाप्रमुख सोपानराव कासारे, नितीन राठोड विभाग प्रमुख अंगद खरात,वैद्यकीय पक्षाचे कैलास चव्हाण यांच्या उपस्थितीत खालील आसनगाव येथील नागरिकांनी अंगद खरात यांच्या पुढाकाराने सदरचा प्रवेश सोहळा पार पडला, यामध्ये उपसरपंच रामकिसन खरात, किसनराव धोंडे,साहेबराव शिंदे, बबनराव जाधव, वेंकटेश खरात, माऊली खरात, हनुमान खरात, माणिक शेळके, गोविंद दादा खरात, भागवत दांगट, ज्ञानेश्वर खरात, विजय मोरे, अशोक सोनटक्के, गोविंद शिंदे, विठ्ठल खरात मंत्री, सुदाम खरात,बबनराव जाधव,परमेश्वर खरात, गोरख नाटकर,रामकिसन खरात, उपसरपंच बाबा राम गरड, गोविंद खरात, संतोष नाटकर, कुमार खरात, विकास शिंदे,सुभाष खरात, विठ्ठल खरात, सोपान पवार,नेमिनाथ नाटकर, वेंकटेश खरात,माऊली खरात, हनुमान खरात, माणिक शेळके, यांच्यासह आदी आसनगाव येथील नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.