सक्रिय जीवन,गतिशील आणि मोकळेपणाने जीवन जगण्यासाठी वयोश्री योजनेमुळे मदत होईल- मा.सरपंच अविनाश राठोड,महाराष्ट्र सरकारकडून ऑफलाईन अर्ज केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये,अर्जदाराने आपले अर्ज जिल्हा समाज कल्याण विभागाला सादर करणे
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
नायगाव येथे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग मंत्रालय कडून विविध योजना अमलात आणलेल्या आहेत त्यापैकी जेष्ठ नागरिकांना वयोश्री योजना ही एक आहे. ग्रामपंचायत मार्फत अर्ज स्वीकारणे आणि ते ऑफलाइन पद्धतीने भरण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यात नायगाव,तळेगाव ,देवगाव खवणे इ. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामपंचायत येथे आपले आवेदन सादर केले होते.
या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना मा.सरपंच अविनाश राठोड यांनी जेष्ठ नागरिकांना वयोश्री योजने अंतर्गत विविध साधने व उपकरणासाठी शासनामार्फत आधार बेसवर तीन हजार रुपये प्राप्त होणारआहे. या पैशाच्या अनुषंगाने घेतलेले साधने किंवा उपकरणामुळे ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवन , एकमेकांन मध्ये संप्रेषण करण्यात, गतिशील व मोकळेपणाने जीवन जगण्यात मदत होईल असे त्यांनी सांगितले.ज्येष्ठ नागरिकाची सेवा करण्याचा काम आमच्या टीमला मिळले हे आमचे सौभाग्य होय. भविष्यात असे कामे मिळाल्यास सर्व एकत्रित मिळून ते काम पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करत राहू.पुढे त्यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेपासून एकही ज्येष्ठ नागरिक वंचित राहणार नाही याची ग्रामपंचायत मार्फत पूर्ण खबरदारी घेतली जाईल असे त्यांनी शेवटी सांगितले.
सरपंचा श्रीमती चंद्रकला सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वयोश्री योजनेचे जवळपास १३० ते १४० आवेदन ग्रामपंचायतला जमा झाली होती. ही संपूर्ण अर्ज तपासणी मा.सरपंच अविनाश राठोड, ग्रामीण रुग्णालय सी.एच.ओ.दिपाली बनसोडे,उपसरपंच नामदेव फुफाटे,ग्रामसेवक बाबासाहेब गवळी ,आरोग्य सहाय्यक ढापसे यांच्या अनुषंगाने करण्यात आली, या अर्जला लागणारे वयाचे आणि आरोग्याची तपासणीचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश राठोड त्यांच्याकडून घेण्यात आले. वयोश्रीचे अर्ज तयार करताना आरोग्य सहाय्यक इकडे ,वाहन चालक , प्रवीण घुले,विनोद खंदारे आणि मा.सरपंच गजानन फुफाटे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
प्राप्त झालेले संपूर्ण प्रोव्हिजनल पात्र अर्जदारांचे
अर्ज नितीन राठोड आणि राजेश राठोड यांच्या मदतीने समाज कल्याण अधिकारी कार्यालय जालना येथे जमा करण्यात आले. या योजनेच्या मदतीसाठी अनिल राठोड, श्रीहरी मगर ,गौतम दाजीजे, यशोदाबाई अंभोरे, प्रल्हाद फुफाटे,समाधान देशमुख लखन राठोड,रणजीत राठोड, गोपाल आढे,अविनाश राठोड, आकाश आढे ,रामानंद राठोड, हेमंत खंदारे,गणेश पवार,कृष्णा राठोड इतरांचे सहकार्य मिळाले.