प्रभावाच्या मुल्यांकनावर कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर होणार,एकदिलाने एकत्र येत जाहीर झालेल्यां उमेदवाराला सहकार्य करावे कॉंग्रेस च्या मेळाव्यात प्रभारी महेशजी शर्मा यांचा इच्छुकांना सल्ला


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
           परतूर मंठा मतदारसंघात कॉंग्रेस चा प्रभाव जास्त असून या परिसरात कॉंग्रेस चा उमेदवार निवडून आण्यासाठी प्रभावी उमेदवाराला निश्चित उमेदवारी मिळेल मात्र तेव्हा आजच्या सर्व इच्छुकांनी एकदिलाने एकत्र येत उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराला सहकार्य करावे असे अवाहन कॉंग्रेस पक्षाचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी महेश शर्मा यांनी केले.
मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या प्रमुख नियोजना खाली परतूर येथे आयोजित कॉंग्रेस पक्षाच्या बुथप्रमुख व पदाधीकारी यांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर सहप्रभारी मा.बाळासाहेब देशमुख, मा.आ.सुरेशकुमार जेथलिया,मा.आ.राजेश राठोड,राजेभाऊ देशमुख ,किसनराव मोरे,अण्णासाहेब खंदारे,बाळासाहेब आकात ,सुरेश पवार,कल्याणराव बोराडे,युवानेते नितीन जेथलिया,बाबासाहेब गाडगे,नीळकंठ वायाळ,इंद्रजित घनवट, सिद्धेश्वर सोळंके, लक्ष्मण शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शन पर मनोगतात महेश शर्मा यांनी परतूर मतदारसंघाच्या आढाव्याचा दाखला देत या परिसरात कॉंग्रेस चे वातावरण चांगले असल्याचे म्हंटले.प्रत्येक वेळी मनोमिलनाचा अभाव असल्याने कॉंग्रेस चा दोन वेळा निसटता पराभव स्वीकारावा लागला मात्र यंदा एक दिलाने एकत्र येत काम केले तर निश्चित कॉंग्रेस ला विजयाची गवसणी घालता येईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.पक्षाची उमेदवारी मागण्याचे अधिकार सर्वांना तरी ही पक्षाच्या वतीने चाचपणी करूनच उमेदवारी जाहीर केली जाईल तेव्हा आत्ता च्या सर्व इच्छुकांनी प्रचारात एकत्र दिसायला हवे अशी अपेक्षा ही त्यांनी शेवटी व्यक्त केली दरम्यान यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना संबोधित करतांना महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे असे म्हणत उद्या सत्ते असणारा कॉंग्रेस पक्ष खरी लोकशाही नांदून दाखवेल कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे असे अहवान त्यांनी केले.सदरील बैठकीचे प्रस्तावित नितीन जेथलिया यांनी केले तर सूत्रसंचालन तारेख भाई सिद्दीकी,यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मण शिंदे यानी मानले.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब अंभिरे,सुखलाल राठोड,सूर्यभान मोरे, सुरेश जिजा सवने,लक्ष्मण शिंदे,मंजुळदास सोळंके,पंजाब देशमुख ,माऊली तनपुरे,हाजी रहेमत खान,प्रफुल्ल आबा शिंदे,सादेक जाहागिरदार,शाकीर भाई मापेगावकर ,प्रविण डुकरे,महादेव घेंमड,दिलीपराव चव्हाण,सुनील तुरेराव,दादाराव हिवाळे,वैजनाथ बागल,दिगंबर इंगळे,संतोष गदे,एकनाथराव कदम,शबाब भाई कुरेशी,कय्युम भाई कुरेशी,मुक्तदीर बागवान,विष्णू तनपुरे,अझहर भाई ,रहेमु भाई कुरेशी,बाबुरावजी हिवाळे,सादिक खतीब,राजेश भुजबळ,अविनाश शहाणे,फेरोज बागवान,मोसीन जमीनदार,शारुख पठाण,राऊत मॅडम,सारिका ताई वरनकर,खाडे मॅडम,राठोड मॅडम, प्रस्तावित बैठकीस काँग्रेस पक्षाचे परतूर मंठा विधानसभा मतदार संघातील सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
                               पक्षप्रवेश
दरम्यान यावेळी मा.आ.सुरेशकुमार जेथलिया व युवा नेते नितीन जेथलिया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पांडेपोखरी गावातील नितीन भदर्गे,अमोल राठोड,वसंत भदर्गे,महादेव खरात,बंडूभाऊ खरात,गंगाराम खरात,कैलास खरात,भगवान खरात,आकाश भदर्गे,नारायण भदर्गे,कृष्णा खरात,कान्हा खरात,विजय खरात,युवराज खरात,शंकर खरात,राहुल भदर्गे ,बाळू पवार ,सुनील पवार,दिलीप आढे,विलास राठोड,अनिल पवार,योगेश पवार,गुलाब खरात.तरुण मंडळीने कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....