आ.गायकवाड यांच्या विरोधात परतूर कॉग्रेस च्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
मुख्यमंत्र्यांची लाडकी पिलावळ सातत्याने वाचाळवीरा सारखे चिथावणी खोर वक्तव्य करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं ज्यांच काम आहे तेच सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत.
काँग्रेस पक्षाचे नेते, लोकसभा विरोधी पक्षनेते खा.राहुलजी गांधी यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार संजय गायकवाड यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले आहे
आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करत आमदार संजय गायकवाड यांच्यावर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन परतुर पोलीस स्टेशनला दिले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नीतीन जेथलीया अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष बालासाहेब अंबिरे,तालुकाध्यक्ष,बाबाजी गाडगे,इंद्रजित घनवट,आशिषजी जेथलिया,सुरेश सवणे, बाबुरावजी हिवाळे, रेहमुशेठ कुरेशी,लक्ष्मण शिंदे,दत्तराव अंभुरे, गणेश ढवळे,लक्ष्मण खोत,शिदू अंभुरे,अंकुश आढे,अनंता भारसाखले,दत्तराव पवार, रफिक कुरेशी,फेरोझ बागवान, दत्ता गाडगे यांच्यासाह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.