जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कंडारी (परतुर), "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा-२ अभियानात तालुक्यातून प्रथम


    
   जालना प्रतीनीधी नरेश अन्ना
  शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा - २ अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत कंडारी (परतूर), ता. घनसावंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा लागलेला आहे.
      शाळेने शैक्षणिक गुणवता, आरोग्य तपासणी, महावाचन चळवळ, विद्यांजली पोर्टल, ऑनलाइन नोंदणी व त्याची पूर्तता, वर्ग सजावट, शालेय भिंतीवरील रंगरंगोटी, आर्थिक साक्षरता, क्रीडा स्पर्धा, व्यक्तिमत्व विकासासह विविध उपक्रमांतील विद्यार्थी सहभाग, शाळा परिसराचे सौदर्यीकरण, प्लास्टिकमुक्त शाळा, तंबाखू मुक्त शाळा, परसबाग, विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा* आदी निकषांची पूर्तता झाल्याने शाळेची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली.
       समस्त गावकरी व पालक यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. त्याबद्दल सर्व गावकरी पालक वर्ग यांचे खूप खूप धन्यवाद. 
    आपण वेळोवेळी असेच सहकार्य करत राहा, उत्तरोत्तर शाळेची शैक्षणिक प्रगती होत राहील.  
शाळेच्या या यशामध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य, तसेच ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, पालक व विद्यार्थी यांचा प्रमुख वाटा आहे.
       शाळेने तालुक्यामधून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व स्तरावर शाळेचे व सर्व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात