परतूर मंठा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक मुखी मागणी



 परतुर/( प्रतिनिधी) 
  परतूर मंठा नेर सेवली मतदारसंघ हा शिवसेनेला सोडण्यात येऊन  शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी परतुर /मंठा नेर सेवली भागातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना नेते व विभागीय नेते अर्जुनराव खोतकर यांची जालना येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. 
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने हा मतदारसंघ सात ते आठ वेळेस निवडणूक लढविलेले आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी पेक्षा शिवसेनेला पोषक वातावरण आहे तसेच भाजपाला सात ते आठ वेळेस उमेदवारी दिली असता यावेळेस शिवसेनेला देणे यात गैर काय आहे? मोहन अग्रवाल हे उच्चशिक्षित असून त्यांना सर्व भाषेचे ज्ञान आहे सर्व सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या सोबत आहेत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून मतदार संघामध्ये त्यांनी शेकडो कोटी रुपयांचे विकास कामे केलेले आहेत तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणी प्रत्येक गावात बूथ प्रमुख, शिवदूत,योजना दूत,शिवसेना सभासद नोंदणी,पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखाप्रमुख,शिवसेना शाखा कार्यकारणी, आशा पद्धतीने शिवसेनेची मतदार  संघामध्ये बांधणी करण्यात आलेले आहे, आणि लोकांचा शिवसेनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असून शिवसेनेमध्ये दररोज मतदार संघातील प्रवेश सोहळे सुरूच असतात, आणि भारतीय जनता पार्टी पेक्षा शिवसेनेला हा मतदारसंघ निवडून येणे अत्यंत सोपे आहे आगामी काळात महाराष्ट्र राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आणयाची असल्यास हा मतदारसंघ शिवसेनेला सोडणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून ह्या सर्व भावनांचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आमच्या भावना कळवण्यात याव्यात अशी विनंती अर्जुनराव खोतकर यांना निवेदनाद्वारे केलेली आहे. लवकरच परतूर मंठा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मुंबई येथे भेटणार आहे त्यांच्याकडे या मतदारसंघाची वस्तूस्थिती मांडणार आहेत अशी ही माहिती मिळालेली आहे. यावेळी शिवसेनेचे जालना जिल्हा संपर्कप्रमुख पंडित दादा भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना दलित आघाडी जिल्हाध्यक्ष भास्करराव मगरे परतुर मंठा मतदार संघ  
 शिस्टमंडळामध्ये मंठा मार्केट कमिटीचे माजी सभापती
प्रल्हादराव बोराडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले परतुर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल सुरूग मंठा तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे शिवाजी तरवटे जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल, विजयकुमार गिरी विधानसभा संघटक, सो ललिता ताई काळदाते महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख, योगेश गंगे उपजिल्हाप्रमुख युवासेना, दीपक हिवाळे शहर प्रमुख परतुर, शेख खाजा अल्पसंख्यांक आघाडी परतुर, राहुल भदर्गे दलित आघाडी तालुकाप्रमुख, नीताताई घोंग महिला आघाडी तालुकाप्रमुख, अविनाश कापसे युवा सेना तालुकाप्रमुख, रंजीत कोल्हे तालुकाप्रमुख परतुर, रामप्रसाद कसा ज्येष्ठ नेते, सोपान का तारे तालुकाप्रमुख, नितीन राठोड तालुकाप्रमुख, अंगत खरात विभाग प्रमुख, मधुकर निलेवाड कैलास ढवळे विभाग प्रमुख, सोनाली देशमुख महिला आघाडी तालुकाप्रमुख, संगीता ताई मगर महिला आघाडी तालुकाप्रमुख परतुर, सोनाली राऊत महिला आघाडी शहर प्रमुख परतुर, रामराव वरकड तालुकाप्रमुख मंठा, विलास राठोड उप तालुकाप्रमुख, दीपक गायकवाड युवा सेना तालुकाप्रमुख मंठा, पांडुरंग बोराडे अमोल वीरकर शिवसेना शहर प्रमुख कैलाश पुरी उपशहर प्रमुख मधुकर निलेवाड, राजाराम भांडवलकर, दत्ता आढाव ग्रामपंचायत सदस्य, उपशहर प्रमुख विनोद खरात सर्कल प्रमुख पाटोदा सुनील गुंड सर्कल प्रमुख तळणी नंदू मामा जाधव सर्कल प्रमुख, अभिषेक रोकडे उपविभाग प्रमुख, चांद भाई अल्पसंख्यांक आघाडी तालुका प्रमुख म्हणतात, कैलास चव्हाण वैद्यकीय कक्ष प्रमुख, सरपंच लक्ष्मण कदम, देविदास शेजुळ संजीव राठोड राम सुरेश दगडू चव्हाण रामा मानू राठोड राजेभाऊ चव्हाण महादेव चव्हाण दगडोबा चव्हाण, विलास भानुदास राठोड, राठोड,, शिवाजी राठोड, औदुंबर गोरे ग्रामपंचायत सदस्य वरफळ, संदिपान रुपनर, साहेबा जरा, बाळासाहेब गोरे, प्रणय मोर शहर प्रमुख, अतुल आर्दड, अशोक टेकाळे, अलीम भाई अल्पसंख्यांक शहर प्रमुख मंठा नागेश चिखले विभाग प्रमुख वाटुर अंगात खरात विभाग प्रमुख वाटुर माऊली वायाळ सर्कल प्रमुख खराडसावंगी, रंजीत कोल्हे, नजीर भाई, शरद तळेकर प्रल्हाद शेळके कविताताई ताठे श्री कदम शाम तळेकर आदिनाथ घुगे   व आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....