न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, परतूर येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती तसेच शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि 05 सप्टेबर रोजी न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, परतूर येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती तसेच शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
   5 सप्टेंबर म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. हा दिवस भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शिकवून ह्या दिनाचा आनंद लुटला. यावेळी कु वैष्णवी बरकुले हिने प्रिन्सिपल पदाची जबाबदारी पार पाडली.
संस्थेचे अध्यक्ष नारायण दादा सोळंके यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बोलतांना संस्थेच्या सचिव छाया बागल म्हणाल्या कि, हा दिवस म्हणजे आपल्या शिक्षकांचे समर्पण, मार्गदर्शन आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरु आणि शिष्य यांच्या नात्यासाठी हा दिवस खूप खास आहे. 
यावेळी उपस्थित सर्व शिक्षक वृंद व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांनी पुष्पहार, शाल व भेटवस्तू देऊन त्यांचा उचित सन्मान केला. मीना पांडूळे, प्रियंका बंड आणि राधिका चव्हाण यांनी गीत सादर केले. तसेच शिक्षक दिना विषयी विद्यार्थ्यांना प्रगती सातपुते, नम्रता खंदारे, महादेव कदम यांनी आपले विचार मांडले .
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद पाठक यांनी केले तर सूत्र संचालन प्रशांत वेडेकर यांनी केले व आभार प्रदर्शन सुरेखा ताजी यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रिन्सिपल साम वर्गीस सर्व शिक्षक वृंद व शिक्षिकेतर कर्मचारी होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....