Posts

Showing posts from October, 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे बीगूल वाजले

Image
प्रतीनीधीनी नरेश /समाधान खरात महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे.सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात होता. दरम्यान, (दि. 15 रोजी ) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडून झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.    महाराष्ट्रात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत. ग्रामीण भागात 57 हजार 601 आणि शहरी भागात 42 हजार 582 केंद्र आहेत. महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार हक्क बजावणार आहेत. तसेच वरिष्ठ नागरिक आपल्या घरून देखील मतदानाचा हक्क बजावू शकतील. असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रात एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186 ग्रामीण मतदान केंद्र – 57 हजार 601 शहरी मतदार केंद्र – 42 हजार 582 महाराष्ट्रात मतदारांची

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त पत्रके, भित्तीपत्रकासाठी मुद्रणावर निर्बंध

जालना प्रतीनिधी नरेश अन्ना   आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रके, भित्तीपत्रके आदि मुद्रणांचे संनियंत्रणासाठी जालना जिल्ह्यातील सर्व मुद्रणालयाचे लक्ष लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम 127-क च्या आवश्यकतेकडे वेधण्यात येत आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.  कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही. निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वतः स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणाऱ्या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये. दिलेल्या सुचनांप्रमाणे निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणाऱ्या व

बलासाहेब आकात यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी.

Image
प्रतीनीधी कैलाश चव्हाण            आज दि. 2 ऑक्टोबर 2024 बुधवार रोजी सातोना खुर्द येथे   सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता  महात्मा  गांधीजी तसेच देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री  जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.या  निमित्त महामानवाच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.