विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त पत्रके, भित्तीपत्रकासाठी मुद्रणावर निर्बंध

जालना प्रतीनिधी नरेश अन्ना
  आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रके, भित्तीपत्रके आदि मुद्रणांचे संनियंत्रणासाठी जालना जिल्ह्यातील सर्व मुद्रणालयाचे लक्ष लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम 127-क च्या आवश्यकतेकडे वेधण्यात येत आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
 कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही. निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वतः स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणाऱ्या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये. दिलेल्या सुचनांप्रमाणे निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हा निवडणुक अधिकारी जालना तसेच संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवावी. अन्यथा संबंधित मुद्रणालयाचा परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल. या ठिकाणी निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक याचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटण्यात आलेले मुद्रीतपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किवा निवडणूकीशी संबंधित असा घोषणा फलक किंवा भित्तीफलक असा होतो. जी व्यक्ती उपरोक्त निर्बंधांचे व्यतिक्रमण करील ती व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असु शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्य दंडास किंवा दोन्ही शिक्षेस पात्र राहिल. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालकांनी सूचनांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात